Police Bharti Question Set 13
Police Bharti Question Set 13
1. संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वादी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
- अमरावती
- पुणे
- नागपूर
- नाशिक
उत्तर : नागपूर
2. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना —— या ठिकाणी उभा राहिला.
- प्रवारानगर
- शाहूनगर
- संभाजीनगर
- इंदिरानगर
उत्तर :प्रवारानगर
3. सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावतांना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता?
- मूलभूत कर्तव्य
- मार्गदर्शक तत्वे
- घटनेचा सरनामा
- मूलभूत हक्क
उत्तर :घटनेचा सरनामा
4. बलवंतराय मेहता समितीने खालीलपैकी कशावर भर दिला होता?
- सत्ता केंद्रीकरण
- सत्ता संग्रहण
- लोकशाही विकेंद्रीकरण
- एकात्मिकरण
उत्तर :लोकशाही विकेंद्रीकरण
5. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणार्या व्यापाराला —– म्हणतात.
- ई मेल
- ई कॉमर्स
- ई अर्थ
- ई मनी
उत्तर :ई कॉमर्स
6. भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
- सुशीलकुमार शिंदे
- राजनाथ सिंह
- देवनाथ सिंह
- आर.आर. पाटील
उत्तर :राजनाथ सिंह
7. निर्मळ भारत अभियानाच्या अंतर्गत 100 टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
- आसाम
- महाराष्ट्र
- त्रिपुरा
- सिक्किम
उत्तर :सिक्किम
8. 2014 च्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या आहेत.
- जपान
- ब्राझील
- स्पेन
- अर्जेटीना
उत्तर :ब्राझील
9. सह संबंध ओळखा.
घोटा : गुडघा, मनगट : ?
- बोट
- पाय
- हात
- कोपर
उत्तर :कोपर
10. जर मूल हा शब्द आईशी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणत्या शब्द शास्त्रज्ञाशी संबंधीत असेल?
- क्रिया
- शोध
- प्रयोग
- शास्त्र
उत्तर :शोध
11. जास्वंदाला कमळ म्हटले, कमळाला गुलाबा म्हटले, गुलाबाला रानफुल म्हटले तर फुलांचा राजा कुणाला म्हणतात?
- रानफुल
- गुलाब
- कमळ
- जास्वंद
उत्तर :रानफुल
12. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
- ज्या वर्षी दुष्काळ पडतो त्या वर्षास तेरा महीने असतात
- आपत्तीत आणखि भर पडणे
- दुष्काळ सुसह्य होणे
- फार मोठा दुष्काळ पडणे
उत्तर :आपत्तीत आणखि भर पडणे
13. भाववाचक नाम ओळखा.
- पौरुषत्व
- स्त्री
- चंद्र
- पाटील
उत्तर :पौरुषत्व
14. रिती वर्तमानकाळ ओळखा.
- मी गात असतो
- मी गाणे गातो
- मी गात असे
- मी गाणे गाईन
उत्तर :मी गात असतो
15. ‘पशुपक्षी’ या शब्दाचा समास ओळखा.
- अव्ययी भाव
- इतरेतर व्दंव्द
- समहार व्दंव्द
- ततपुरुष
उत्तर :इतरेतर व्दंव्द
16. ‘तो रोज अभ्यास करतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
- कर्मणी
- सकर्मक भावे
- अकर्मक भावे
- सकर्मक कर्तरी
उत्तर :सकर्मक कर्तरी
17. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
- पुत्र
- राजकन्या
- महाराणी
- कन्या
उत्तर :पुत्र
18. ‘वाघ्या’ शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा.
- वाघिण
- वाघी
- मुरळी
- मुरळिण
उत्तर :मुरळी
19. नदी : सरिता :: समुद्र : ?
- पाणी
- मगर
- रत्नाकर
- मोती
उत्तर :रत्नाकर
20. ‘अनुनासिक’ हे पर्यायातून शोधा.
- दंत्यवर्ण
- परवर्ण
- नीसीकोच्चार
- संयुक्त स्वर
उत्तर : परवर्ण