Police Bharti Question Set 17

Police Bharti Question Set 17

1. —– हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय.

  1.  नागपूर
  2.  अमरावती
  3.  यवतमाळ
  4.  चंद्रपूर

उत्तर : नागपूर


 2. मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

  1.  चंद्रपूर
  2.  गडचिरोली
  3.  नागपूर
  4.  अमरावती

उत्तर :अमरावती


 3. पोलिओ मुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याचे परिणाम होतो?

  1.  हाडे
  2.  त्वचा
  3.  स्नायु
  4.  मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था


 4. संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे —– होय.

  1.  माहिती एकत्र करणारी यंत्रणा
  2.  केंद्रीय मेमरी
  3.  एक सॉफ्टवेअर
  4.  माहिती साठविण्याचे एक साधन

उत्तर :माहिती साठविण्याचे एक साधन


 5. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात?

  1.  XX
  2.  XXX
  3.  XY
  4.  XYX

उत्तर :XY


 6. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे?

  1.  पृथ्वी
  2.  नेपच्यून
  3.  गुरु
  4.  बुध

उत्तर :गुरु


 7. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

  1.  देवी
  2.  मधुमेह
  3.  पोलिओ
  4.  डांग्या खोकला

उत्तर :मधुमेह


 8. ‘अमृत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

  1.  विष
  2.  मध
  3.  दूध
  4.  औषध

उत्तर :विष


 9. ‘आकाश’ या शब्दास समानार्थी असलेल्या शब्द निवडा.

  1.  आरसा
  2.  औदुंबर
  3.  अंबर
  4.  मंदाकिनी

उत्तर :अंबर


 10. उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते?

  1.  उंदरे
  2.  उंदरांना
  3.  उंदीरं
  4.  अनेक वचन होत नाही

उत्तर :अनेक वचन होत नाही


 11. ‘विजय निबंध लिहितो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

  1.  कर्तरी
  2.  कर्मणी
  3.  भावे
  4.  कर्मकर्तरी

उत्तर :कर्मणी


 12. खालील वाक्यातील काळ ओळखा.

‘रामा पुस्तक वाचतो’

  1.  वर्तमान काळ
  2.  भूतकाळ
  3.  भविष्यकाळ
  4.  रितीवर्तमान काळ

उत्तर :वर्तमान काळ


 13. वाक्याचा प्रकार ओळखा.

‘सर्वांनी शांत बसा’

  1.  संकेतार्थी
  2.  विध्यर्थी
  3.  संयुक्त
  4.  आज्ञार्थी

उत्तर :आज्ञार्थी


 14. वाक्याचा प्रकार सांगा. अबब! केवढा हा उंचच उंच कडा.

  1.  विधानार्थी
  2.  प्रश्नार्थी
  3.  उद्गारार्थी
  4.  होकारार्थी

उत्तर :उद्गारार्थी


 15. ‘जहाल’ या शब्दाचा विरूद्ध अर्थाचा शब्द कोणता?

  1.  मवाळ
  2.  शेळपट
  3.  भित्रा
  4.  नरम

उत्तर :मवाळ


 16. ‘मी शाळेत जाणार नाही कारण मला ताप आला आहे.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

  1.  साधे
  2.  संयुक्त
  3.  मिश्र
  4.  पुरुषत्व

उत्तर :मिश्र


 17. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

  1.  पाटील
  2.  सोमवार
  3.  श्रीमंत
  4.  पुरुषत्व

उत्तर :पुरुषत्व


 18. खालील शब्दातील ‘भोजन’ या शब्दाचा अर्थ ओळखा.

  1.  उपहार
  2.  बिहार
  3.  परिहार
  4.  आहार

उत्तर :आहार


 19. खालील शब्दातील ‘सिंह’ या अर्थाचा शब्द कोणता आहे?

  1.  पुढारी
  2.  लोकसत्ता
  3.  केसरी
  4.  सकाळ

उत्तर :केसरी


 20. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा काय अर्थ होतो?

‘जिभेला हाड नसणे’

  1.  भीती वाटणे
  2.  प्रशंसा करणे
  3.  संतापणे
  4.  वाटेल ते बोलणे 

उत्तर :वाटेल ते बोलणे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.