प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Yojana)
*प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या प्रथम टप्प्यामध्ये एका वर्कशॉपचे नियोजन करण्यात आले होते. हे वर्कशॉप 19 एप्रिल 2015 रोजी रामबाबू म्हालगी प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
*या वर्कशॉपचा मुख्य उद्देश सरकारमार्फत पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली कल्याण योजना पुन्हा नवीन पद्धतीने जनतेसमोर सादर करणे हा होता.
*या वर्कशॉपअंतर्गत उच्च मंत्रालयास एक कार्य देण्यात आले आहे. यामध्ये गरीबी उन्मूलनकरिता एक रोड मॅप तयार करणे व हा रोड मॅप संसदेच्या (PM) सदस्यासमोर सादर करणे.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana (PMKSY)
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे फायदे-
1.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) समाज आणि राष्ट्रामधून गरिबी समाप्त करण्याचे कार्य करेल.
2.या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विविध स्तरावर वर्कशॉपचे नियोजन करेल, ज्यामध्ये गरिबी समाप्त करण्याच्या प्राथमिक कारणांविषयी जनतेशी चर्चा केली जाईल.
3.या योजनेचे प्रमुख लक्ष्य हे आहे की, गरिबी रेषेच्या खालील जनता आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाच्या जीवनामध्ये मोठी सुधारणा करणे.
4.या योजनेअंतर्गत 1.5 लाख व्यक्तींना लाभ देण्यात येईल.
5.या योजनेअंतर्गत गरिबी रेषेखालील व्यक्तीस खाद्यान्न व इतर गरजेचे समान कमी किमतीत उपलब्ध होईल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पात्रता –
1.तो भारतीय नागरिक असावा. प्रत्येक भारतीय व्यक्ती या वर्कशॉपचा हिस्सा बनू शकते.
2.या योजनेत सहभागी होण्यास उमेदवाराजवळ आधार कार्ड, ओळखपत्र व रहिवासी दाखला असणे गरजेचे राहील.
3.या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्रामीण भागात उमेदवारांना जवळील ग्रामपंचायतीशी संपर्क करावा लागेल.
4.शहरी भागामध्ये उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी नगरपालिकेशी संपर्क करावा लागेल.
*प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना म्हणून ओळखली जाते.
*ही योजना सध्या प्राथमिक स्तरावर आहे. सध्या ही सुरू नाही. सर्व संसदेच्या सदस्यांच्या समर्थनानंतर ही योजना पुढे जाईल व पुढे अधिकारिक स्वरुपात चालू होऊ शकेल.
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (Pradhan Mantri Khanij Kalyan Yojana (PMKKY)