प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana – PMJJBY)
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana – PMJJBY)
योजनेची सुरुवात – 9 मे 2015 रोजी या योजनेची सुरवात झाली.
योजनेचे उद्देश – देशामध्ये जीवन विम्याचे प्रमाण वाढविणे
Must Read (नक्की वाचा):
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana – PMSBY)
*PMJJBY अंतर्गत 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तीला 2 लाख रूपयांचा विमा प्राप्त होईल.
*PMJJBY योजनेअंतर्गत वार्षिक 330 रूपयांचा हप्ता असून तो लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आपोआप जमा केला जाईल.
*वार्षिक हप्त्याचे आर्थिक वर्ष 1 जून ते 31 मे असे राहील.
*PMJJBY अंतर्गत लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येते.
*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेस 2015-16 पासून सेवा करातून 100% सूट देण्यात आली आहे.
*जी व्यक्ती प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 50 वर्षांच्या अगोदर घेतील त्यास जीवन विमा संरक्षण 55 वर्षांपर्यंत मिळेल; परंतु त्या व्यक्तीस असा लाभ मिळविण्यासाठी नियमित स्वरुपात विमा हप्ता भरणे आवश्यक राहिल.
*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विम्याचा कालावधी अधिक असल्यास कालावधीप्रमाणे विम्याचा हप्ता भरणे बंधनकारक राहील.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत बँकेची भूमिका –
1.मास्टर अकाऊंट होल्डर असणे आणि प्रत्येक वर्षी विमा हप्ता खातेदाराच्या खात्यातून रक्कम जामा करून घेणे.
2.मुद्रित फॉर्म उपलब्ध करणे.
3.आपोआप खात्यातील पैसे कट/कमी होतील त्याचे अधिकार पत्र भरून घेणे.
4.खातेदाराच्या खात्यातील विमा हप्ता स्वरुपात कपात करण्यात आलेले पैसे कंपनीस पोहचविणे.
विमा हप्ता विभागणी –
330 रु. वार्षिक विमा हप्त्यामधील 289 रु. विमा कंपनीस देण्यात येतील आणि 30 रु. भुगतान BC कॉर्पोरेट किंवा मायक्रो एजंट्सचे होतील. त्याचबरोबर बँकेस 11 रु. व्यवस्थापन खर्च म्हणून देण्यात येतील.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता –
1.या योजनेअंतर्गत 18 ते 50 वर्षातील बँक खातेधारक व्यक्ती लाभ घेऊ शकतात.
2.या यहोजनेचा लाभार्थी होण्यासाठी आधारकार्ड नंबर देणे आवश्यक आहे.
3.या योजनेत सहभागी होण्यासाठी एक स्वप्नप्रमाणित स्वास्थ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 31 मे पर्यंत फॉर्म भरून बँकेत देणे गरजेचे राहील.
*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची कार्यवाही SBI (भारतीय स्टेट बँक) व LIC (भारतीय जीवन विमा निगम) मार्फत केली जात आहे.
*प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कलम 80 C अंतर्गत 100% करमुक्त आहे; परंतु जर विमा पॉलिसीअंतर्गत 1 लाख रु. देण्यात आले व फॉर्म 15 G व 15 H जमा नाही करण्यात आले तर तेव्हा एकूण उत्पन्नातून 2% TDS कापण्यात/कमी करण्यात येईल.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे नियम –
1.प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याच्या 55 व्या वर्षी बंद करण्यात येईल.
2.पॉलिसी रिन्यू न केल्यास ही योजना बंद करण्यात येईल.
3.विमा हप्त्याची रक्कम (330 रु.) वेळेवर न भरल्यास बँक किंवा विमा कंपनीमार्फत योजना बंद करण्यात येईल.
4.विमा धारकाची अनेक खाती असतील तरी या योजनेचा लाभ एकाच खात्याअंतर्गत प्राप्त होईल.