प्रमाण भागीदारी
प्रमाण भागीदारी
Must Read (नक्की वाचा):
नमूना पहिला –
उदा. संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे, तर म्हैशीची किंमत किती?
- 3500
- 3000
- 4000
- 4500
उत्तर : 3000
प्रमाण = 4:6:9
4+6+9=19
भाग = 9500
1 भाग = 9500/19 = 500
6 भाग = 3000
नमूना दूसरा –
उदा. श्रीपत व महिपत यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:2 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती?
- 9:4
- 4:9
- 4:6
- 1:1
उत्तर : 1:1
भांडवलाचे गुणोत्तर × मुदतींचे गुणोत्तर = नाफयाचे गुणोत्तर
3:2×2:3= 3/2×2/3=1/1= 1:1
नाफयाच गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर = मुदतींचे गुणोत्तर
नाफयाचे गुणोत्तर ÷ मुतींचे गुणोत्तर = भांडवलाचे गुणोत्तर
नमूना तिसरा –
उदा. भिकोबाने 4000 रु. 5 महिन्यांसाठी व तुकारामाने 3000 रु. 4 महिन्यांसाठी एका व्यवसायात गुंतविले. त्यांना एकूण नफा 1600 रु. झाला, तर भिकोबाचा नफ्यातील वाटा किती रुपये?
- 600 रु.
- 1200 रु.
- 800 रु.
- 1000 रु.
उत्तर : 1000 रु.
भांडवलाचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर = नाफयाचे गुणोत्तर
4000:3000
4/3×5/4=5/3= 5:3
8 भाग = 1600
1 भाग = 200 त्यानुसार 5 भाग = 5×200 = 1000
नमूना चौथा –
उदा. गुरुनाथने 12000 रु. भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यांतर दिनानाथाने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली. वर्षाअखेर त्या धंधात झालेल्या 2200 रु. नफ्यापैकी दिनानाथला 1000 रु. मिळाले: तर दिनानाथाने किती रक्कम गुंतविली होती?
- 12000 रु.
- 18000 रु.
- 15000 रु.
- 10000 रु.
उत्तर : 15000 रु.
गुरुनाथ दिनानाथ गुणोत्तर
भांडवल 12000 : X 12:X
मुदत 12 : 8 3:2
नफा 1200 : 1000 6:5
नाफयांचे गुणोत्तर ÷ मुदतींचे गुणोत्तर = भांडवलाचे गुणोत्तर
6/5÷3/2=6/5×2/3=12/15
गुरुनाथचे भांडवल = 12000 रु. = 12 भाग
दिनानाथचे भांडवल = 15 भाग = 15000 रु.