प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती
प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- सृष्टी -प्राणी
- उपसृष्टी – मेटाझुआ
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
- प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
- पोरीफेरा – सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
- सिलेंटराटा – हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
- प्लॅटीहेल्मिन्थीस – प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
- नेमॅटहेल्मिन्थीस – अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
- अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
- आथ्रोपोडा – खेकडा , झुरळ , कोळी
- मोलुस्का – शंख , शिंपला , गोगलगाय
- इकायानोडर्माटा – तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
- हेमिकॉर्डाटा – बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी
संघ – कॉर्डाटा
उपसंघ –
- युरोकॉर्डाटा – अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
- सेफॅलोकॉर्डाटा – अॅम्फीऑक्सस
- व्हर्टीब्रेटा –
- वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा – पेट्रोमायझॉन , मिक्झीन
- वर्ग 2- पायसेस – डॉगफिश. रोहू
- वर्ग 3- अम्फिबिया – बेडूक , टोड
- वर्ग 4- रेप्टीलीया – कासव , पाल
- वर्ग 5- एवज – पोपट , बदक
- वर्ग 6- मॅमॅलिया – वटवाघूळ, खार, मानव
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ : प्रोटोझुआ –
- हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
- पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
- प्रजनन – व्दिविभाजन, बहुविभाजन
- उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
- गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.
- आकार अनियमित असतो.
- अंत:पेशीय रक्तशोषी परजीव
- मानवाच्या पांढऱ्या पेशीत
- मालेरीयास कारणीभूत असतो.
- अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
संघ : पोरीफेरा –
- शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
- त्यांना ऑस्टिया म्हणतात.
- सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
- प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
- उदा. सायकॅन , युस्पॉजिया
संघ : सिलेंटराटा –
- समुद्रात आढळतात.
- अरिय सममित व व्दिस्तरिय
- देह गुहा असते.
- शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
- प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
- उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस –
- शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.
- पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक
- अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.
- बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.
- उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
संघ : नेमॅटहेल्मिन्थीस –
- शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
- त्यांना गोलाकृमी म्हणतात.
- अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
- माणसात रोगानिर्मिती करतात.
- उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
संघ : अॅनिलीडा –
- लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.
- त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
- लैंगिक प्रजनन करतात.
- उदा. गांडूळ , लीच , नेरीस
संघ : आथ्रोपोडा –
- प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ
- प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.
- त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित
- शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.
- एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.
- उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम
संघ : मोलुस्का –
- प्राण्यातील दुसरा मोठा संघ
- बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.
- हे प्राणी एकलिंगी असतात.
- उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
संघ : इकायानोडर्माटा –
- फक्त समुद्रातच आढळतात.
- त्रिस्तरी , एकलिंगी
- कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.
- पुनरुदभवन क्षमता असते.
- उदा . तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
संघ : हेमिकॉर्डाटा –
- प्रामुख्याने सागरनिवासी
- शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित
- फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.
- शरीराचे तीन भाग – सोंड , कॉलर , प्रकांड
- श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.
- लैंगिक प्रजनन करतात.
- उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी
संघ – कॉर्डाटा
- शरीरास आधार देणारा पृष्ठरज्जू असतो.
- विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत पृष्ठरज्जू असतो.
- चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस नालीसारखा पोकळ असतो.
- ह्दय अधर बाजूस असते.
उपसंघ : युरोकॉर्डाटा –
- कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी
- सागरनिवासी.
- उभयलिंगी.
- उदा. अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
सेफॅलोकॉर्डाटा –
- पृष्ठरज्जू संबध शरीराच्या लांबीइतका असतो.
- ग्रसनी मोठी असून तिला कल्लाविदरे असतात.
- एकलिंगी.
- उदा. अॅम्फीऑक्सस
व्हर्टीब्रेटा –
- पृष्ठराज्जुचे रुपांतर पाठीच्या कण्यात झालेले असते.
- शीर पूर्णपणे विकसित
- मेंदू कवटीत संरक्षित
- अंत:कंकाल अस्थिमय
- 6 वर्गात विभागणी पुढीलप्रमाणे
- जबडे विरहित चुशिमुख
- त्वचा मृदू व खवलेविरहित
- अयुग्मीत पर असतात.
- बहुतेक बाह्यपरजीवी
- उदा . पेट्रोमायझॉन , मिक्झीन
- शीतरक्ती व पाण्यात राहणारे असतात.
- शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते.
- श्वसन कल्ल्याद्वारे होते.
- डोळ्यांना पापण्या नसतात.
- असंख्य अंडी घालतात.
- उदा. डॉगफिश. रोहू
- पाण्यात तसेच जमिनीवर आढळतात.
- शरीरावर खवले नसतात.
- त्वचा मृदू ,श्लेष्मल असते.
- ह्रदयाला तीन कप्पे असतात.
- एकलिंगी , अंडज असतात.
- बह्याकर्ण असतो.
- उदा. बेडूक , टोड
- सरपटणारे प्राणी
- पहिले कशेरूस्तंभ युक्त प्राणी
- त्वचा कोरडी , खवलेयुक्त असते .
- अंगुलीना नखे असतात.
- उदा. – कासव , पाल
- कशेरूस्तंभ युक्त प्राणी
- कोष्णरक्ती प्राणी
- पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकुलीत झालेले आहेत.
- उदा .-पोपट , बदक
- एकलिंगी , अंडज
- पोकळ हाडे असतात.
- ह्रदयाला चार कप्पे असतात.
- बह्यामुखाचे चोचीत रुपांतर झालेले असते.
- पुढच्या पायाचे पंखात रुपांतर झालेले असते.
- अतिशय उत्क्रांत
- उष्णरक्त प्राणी
- दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात.
- शरीरावर केसांचे आच्छादन असते.
- एक्लिंगी जरायुज
- प्लॅटीपस व एकीडना अंडी घालतात.
- फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात.
- ध्वनीनिर्मिती करतात.
- उदा : वटवाघूळ, खार, मानव , सिंह, माकड
खूप उपयुक्त वेबसाईट आहे।
खूप खूप आभारी आहोत।