RBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना
RBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जविषयक माहितीची सार्वजनिक डिजिटल रजिस्ट्री नोव्हेंबर 2018 पासून चालू केली आहे. या रजिस्ट्रीमध्ये कर्ज घेणार्या व्यक्ती व कंपन्यांची कर्जविषयक माहिती सार्वजनिक केली जाईल. भारतीय अर्थव्यवस्थेतील बुडीत कर्ज्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर PCRची स्थापना करण्याचा निर्णय महत्वपूर्ण आहे.
कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्री (Public Credit Registry – PCR)
- PCR ही कर्जदाराविषयी वैध व बारीकसारीक सखोल माहिती असलेली डिजिटल रजिस्ट्री आहे.
- या रजिस्ट्रीमध्ये पुढील माहिती समाविष्ट असेल.
कर्जदाराची (Borrowers) सखोल माहिती.
मुद्दाम दिवाळखोर बनलेल्या व्यक्ती/कंपनीची माहिती.
कर्जदारांवर असलेले कायदेशीर खटले.
कर्जदाराची पुढील संस्थांकडून मिळालेली माहिती.
i) सेबी (SEBI).
ii) उद्योग व्यवहार मंत्रालय.
iii) जीएसटी नेटवर्क (GSTN).
iv) भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI).
या रजिस्ट्रीमुळे सध्याच्या व पुढील कर्जदारांची 360° वित्तीय प्रोफाईल उपलब्ध होईल. - ही रजिस्ट्री वित्तीय माहितीची साधनसामग्री म्हणून काम करेल व विविध संस्थांना संबंधित माहिती पुरवेल. त्यामुळे सध्याची कर्जविषयक माहितीव्यवस्था समृद्ध होईल.
- बँकांना कर्जपुरवठा करताना ही माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होईल.
- PCR ची स्थापना करण्याची शिफारस वाय.एम. देवस्थळे समितीने केली होती.
- सध्या भारतात वेगवेगळ्या कर्जविषयक माहिती रजिस्ट्री आहेत.
i) RBI ची Central Repository of Information of Large Credit (CRILC).
ii) 4 खासगी कर्जविषयक माहिती कंपन्या (Credit Information Companies).
sir me f.y.b.com me study kar raha hu. to me psi ban sakta hu kya? psi banane ki khvaish meri puri ho sakati hai kya?