पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे
- क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.
- सीमा – उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.
- ‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.
- राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.
- देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.
- पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.
- पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.
- जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.
- आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.
- देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
- चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.
- लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.
- जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.
- आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
- राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.
- भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.
- उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.
- दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.
- वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.
- सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
- भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.
- वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.
- वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
- पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.
- पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.
- 1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.
- ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.
- पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.
- राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)
- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे
- राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे
- महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
- राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे
- भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे)
- महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे
- सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला
- फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे
- नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सांगली
- क्षेत्रफळ – 8,572 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 10 – खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव.
- सीमा – उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.
- 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले.
- सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात.
- हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात ‘शाळू’ म्हणून ओळखले जाते.
- सांगली – शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे.
- मिरज – येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे.
- औंदुबर – या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे.
- बहादूरवाडी – या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला.
- बेडग – ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
- भोपाळगड – ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता.
- भोसे – येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे.
- देवराष्ट्र – हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे.
- कासबे दिग्रज – मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे.
- कुंडल – तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे.
- शिराळा – या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात.
- मच्छिंद्रगड – कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सातारा
- क्षेत्रफळ – 10,480 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 11 – खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड.
- सीमा – उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे.
- रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.
- येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला.
- ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे.
- सातारा – सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये ‘अजिक्यतारा’ हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे.
- महाबळेश्वर, पाचगणी – हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर.
- वाई – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे.
- पाटण – येथे ‘शिवाजीसागर’ हा जलाशय आहे.
- कर्हाड – एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे.
- औंध – औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.
- प्रतापगड – महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.
- चाफळ – छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.
- सज्जनगड – स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास ‘सज्जनगड’ असे नाव देण्यात आले आहे.
- म्हसवड – येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे.
- माहुली – ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.
- मसूर – ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.
- निगडी – समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – कोल्हापूर
- क्षेत्रफळ – 7,685 चौ. कि.मी.
- लोकसंख्या – 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 12 – शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.
- सीमा – उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहे.
- पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास ‘करवीर’ असे नाव पडले. दुसर्या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर ‘कोल्हासूर’ नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले.
- हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत.
- गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले.
- कोल्हापूर – महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. ‘कुस्तीगिरांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. ‘खासबाग’ हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते.
- पन्हाळा – पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे.
- राधानगर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.
- बाहुबली – हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
- आजरा – (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.
- आळते – (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा.
- इचलकरंजी – (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत.
- कणेरी – (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे.पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो.
- बालिंगे – (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.
- ज्योतिबा – (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते.
- वडगाव – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे.
- नरसिंहांची वाडी – यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध.
- हुपरी – हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.
- हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात.
- कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत.
- कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात.
- कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत.
- पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे.
- विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे.
- सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे.
- राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे.
- राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात.
- शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे.
- कोल्हापूरला खासबाग मैदान आहे.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.
- शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे.
- कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे.
- कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.
- जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – सोलापूर
- क्षेत्रफळ – 14,895 चौ.कि.मी.
- लोकसंख्या – 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
- तालुके – 11 – करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट.
- सीमा – उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे.
- हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे.भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला.
- येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे.
- सोलापूर – येथील चादरी ‘सोलापुरी चादर’ या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत.
- पंढरपूर – पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात.
- अक्कलकोट – स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर.
- करमाळे – येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे.
- बेगमपुर – ता. मोहळ – येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.
- ब्र्म्ह्पुरी – हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे.
- नान्नज – सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा ‘माळढोक’ या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे.
- सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.
- चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय.
- सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.
- सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळी येथे आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत.
- सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).
- वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे.
- सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे.
- सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग.
- चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.
This information is very useful and important. Sir when we are started the MPSC exam preparation ?
In which class we started the preparation of MPSC exam?
civil engineer post sathi zp cha kay syllabus asel ?
full syllabus send kara please email id var …
Nice information
PDF aahe ka vanrakshak sted
Pdf miltil ka ?
Nice information