राजकीय विचारवंत – लोकमान्य टिळक
राजकीय विचारवंत – लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळक (सन 1856 ते 1920) :-
- लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हे होते. त्यांचा जन्म 28 जुलै, 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
- गोरगरीबी जनतेला शिक्षण घेता यावे या उद्देशाने लोकमान्य टिळक, आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सन 1881 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. यानंतर सन 1884 मध्ये डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले.
- जनतेमध्ये सामाजिक व राजकीय वैचारिक जागृती घडवून आणण्याच्या भावनेने टिळक व आगरकर यांनी सन 1881 मध्ये मराठा व केसरी ही दोन साप्ताहिके सुरू केली. यापैकी टिळक हे मराठाचे संपादक होते व आगरकर हे केसरीचे संपादक होते.
- सर्वसामान्य जनतेत राजकीय जागृती व एकोप्याची भावना वाढीस लागावी म्हणून सन 1894 मध्ये गणेशोत्सव व सन 1895 मध्ये शिवजयंती हे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्यास सुरुवात केली.
- सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळनीवरून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन विचारांचे तट पडले. यापैकी लोकमान्य टिळक हे जहाल गटाचे नेते होते. टिळकांनी बंगालच्या फाळणीविरुद्ध संपूर्ण भारतात जागृती घडवून आणली व स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार तत्वांचा भारतभर प्रसार केला.
- सन 1914 मध्ये टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आल्यानंतर त्यांनी एप्रिल 1916 मध्ये होमरूल लीग चळवळ सुरू केली. या चळवळीच्या निमित्ताने बेळगाव येथे सभा भरली असताना अध्यक्षीय पदावरून बोलताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच असे जाहीररित्या घोषित केले.
- त्यांनी मांडले येथील तुरुंगात असताना गीता रहस्य हा भगवतगीतेवर आधारित टीकाग्रंथ लिहिला. त्यांनी ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज हे वेदांवर आधारित ग्रंथ लिहिले.
- लोकमान्य टिळक हे भारतीय राजकारणात तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून ओळखले जात असे. त्यांनी ब्रिटिश सत्तेबाबत भारतीय जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण केला. म्हणून चिरोलने दि इंडियन अनरेस्ट ह्या ग्रंथात लोकमान्य टिळक यांचे वर्णन भारतीय असंतोषाचे जनक अशा शब्दात केले आहे.
- अशा या महान नेत्याचे एक ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे निधन झाले.