Rajyaseva Pre-Exam Question Set 19

Rajyaseva Pre-Exam Question Set 19

13 फेब्रुवारी 2011 प्रश्नसंच 3 :

1. सध्या भारतामध्ये कोणती पंचवार्षिक योजना सुरू आहे?

  1.  नववी
  2.  दहावी
  3.  अकरावी  
  4.  बारावी

उत्तर : अकरावी 


2. भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण

  1.  वाढत आहे
  2.  घटत आहे
  3.  समान आहे
  4.  यापैकी कोणतेही नाही

उत्तर : घटत आहे


3. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा परवलीचा शब्द कोणता होता?

  1.  जलद प्रगती
  2.  अधिक रोजगारी
  3.  उत्पन्नाचे समवाटप
  4.  गरीबी हटाव

उत्तर : गरीबी हटाव


4. महाराष्ट्रात जिल्हा स्तरावरील नियोजनाची सुरुवात खलील वर्षी झाली.

  1.  1970
  2.  1954
  3.  1974
  4.  1951

उत्तर :1974


5. कोणत्या कारणामुळे किंमती वाढतात?

  1.  अप्रत्यक्ष कर
  2.  प्रत्यक्ष कर
  3.  अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर
  4.  यापैकी नाही

उत्तर : अप्रत्यक्ष कर


6. खालीलपैकी किंमतवाढीस कोणते एक कारण नाही?

  1.  तुटीचा अर्थभरणा
  2.  लोकसंख्या वाढ
  3.  बेरोजगारीत वाढ
  4.  प्रशासकीय खर्चात वाढ

उत्तर : बेरोजगारीत वाढ


7. आधारवर्षातील निर्देशांक नेहमी प्रमाण असतो.

  1.  0
  2.  10
  3.  100
  4.  1000

उत्तर : 100


8. भाववाढ नियात्रित करण्यासाठी कोण कार्य करते?

  1.  रिझर्व्ह बँक
  2.  केंद्र सरकार
  3.  कृषि मंत्रालय
  4.  भाववाढ नियंत्रण मंडळ

उत्तर : केंद्र सरकार


9. किंमत वाढीचे नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजने मध्ये प्रथमच जाहीर केले गेलेले उद्दीष्ट होते?

  1.  सातव्या
  2.  नवव्या
  3.  दुसर्‍या
  4.  पहिल्या

उत्तर : पहिल्या


10. खालीलपैकी हरभरर्‍याचा कुठला वान मर रोगास सहनशील असून उशिरा पेरणीसाठी योग्य आहे?

  1.  विजय
  2.  विशाल
  3.  विराट
  4.  दिग्विजय

उत्तर : दिग्विजय


11. भात शेतीमध्ये पाणी साचलेले असताना चिखलणी करण्यासाठी —– हे अवजार उपयुक्त आहे.

  1.  पलटी नांगर
  2.  पात्यांचा नांगर (डिस्क प्लो)
  3.  पडलर
  4.  ट्रम्प्लर

उत्तर : पडलर


12. कडधान्य पिकांमध्ये, —– उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.

  1.  तुरीची
  2.  उडदाची
  3.  कुळीथाची
  4.  पावट्याची

उत्तर : तुरीची


13. सिसॅमम इंडिकम एल.(तीळ) या पिकामध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते?

  1.  30 ते 35%
  2.  35 ते 38%
  3.  25 ते 30%
  4.  45 ते 50%

उत्तर : 45 ते 50%


14. महाराष्ट्रात —– जिल्ह्यात उसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

  1.  सातारा
  2.  सांगली
  3.  सोलापूर
  4.  कोल्हापूर

उत्तर : कोल्हापूर


15. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून —– किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.

  1.  खोड माशी
  2.  खोड किडा
  3.  मिज माशी
  4.  पांढरी माशी

उत्तर : खोड माशी


16. सुरू ऊस पिकास —– हे से.मी. पाण्याची गरज असते.

  1.  75
  2.  175
  3.  275
  4.  375

उत्तर : 275


17. —– विभागात सर्वाधिक निव्वळ सिंचन क्षेत्र आहे.

  1.  नाशिक
  2.  कोल्हापूर
  3.  पुणे
  4.  नागपूर

उत्तर : पुणे


18. शेततळ्यातून होणारा पाण्याचा निचरा —– वापरुन परिणामकारकरीत्या थांबविता येतो.

  1.  वाळू
  2.  पोयटा
  3.  पी.एम.ए.
  4.  बंटोनाईट

उत्तर : बंटोनाईट


19. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती:हवा:पाणी यांचे प्रमाण —– असावे.

  1.  50:25:25
  2.  40:20:40
  3.  30:30:40
  4.  30:40:30

उत्तर : 50:25:25


20. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने (1999) राज्याची कमाल सिंचन क्षमता —– लाख हे ठरविलेली आहे.

  1.  100
  2.  75
  3.  105
  4.  126 

उत्तर : 126

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.