Rajyaseva Pre-Exam Question Set 20
Rajyaseva Pre-Exam Question Set 20
13 फेब्रुवारी 2011 प्रश्नसंच 1 :
1. पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली?
- दादाभाई नौरोजी
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
- सर.ए.ओ. ह्युम
- लोकमान्य टिळक
उत्तर : सर.ए.ओ. ह्युम
2. पुणे येथे ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना कोणी केली?
- सावित्रीबाई फुले
- पंडिता रमाबाई
- इरावती कर्वे
- अनुताई वाघ
उत्तर : पंडिता रमाबाई
3. ‘विद्यापीठ अनुदान आयोगाची’ स्थापना कोणत्या वर्षी झाली?
- 1957
- 1958
- 1956
- 1959
उत्तर :1956
4. ‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- गोपाळ गणेश आगरकर
- लोकमान्य टिळक
- विष्णुशास्त्री चिपळूणकर
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर
5. ‘मानव धर्म सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
- महात्मा ज्योतिबा फुले
- गणेश वासुदेव जोशी
- बाबा पडमनजी
- दादोबा पांडुरंग तर्खडकर
उत्तर : दादोबा पांडुरंग तर्खडकर
6. सन 1927 चा वर्षी महाड येथील चवदार तळ्यावर कोणी सत्याग्रह केला?
- महात्मा गांधी
- व्ही.आर.शिंदे
- व्ही.डी. सावकार
- डॉ. बी.आर.आंबेडकर
उत्तर : डॉ. बी.आर.आंबेडकर
7. ‘समाज स्वास्थ्य’ हे मासिक कोणी सुरू केले?
- र.धों. कर्वे
- महात्मा फुले
- छ. शाहू महाराज
- धोंडो केशव कर्वे
उत्तर : र.धों. कर्वे
8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात —– क्रमांक लागतो.
- पाचवा
- सहावा
- सातवा
- आठवा
उत्तर : सातवा
9. पर्वतीय मृदेस —– मृदा म्हणून ओळखल्या जाते.
- काळी कापसाची
- अपरिपक्व
- पीट
- अल्कली
उत्तर : अपरिपक्व
10. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा —– आहे.
- पुणे
- अहमदनगर
- नागपूर
- यवतमाळ
उत्तर : अहमदनगर
11. मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ —– जिल्ह्यात वसलेला आहे.
- गडचिरोली
- भंडारा
- अमरावती
- यवतमाळ
उत्तर : अमरावती
12. कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?
- चंदन
- साग
- वड
- आंबा
उत्तर : साग
13. —– या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.
- सातारा
- कोल्हापूर
- कराड
- महाबळेश्वर
उत्तर : कराड
14. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या (strength) किती आहे?
- 72
- 36
- 90
- 78
उत्तर : 78
15. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या किती सभासद आहेत?
- 19
- 48
- 78
- यापैकी नाही
उत्तर : 78
16. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो?
- विस्तार अधिकारी
- ग्रामसेवक
- सभापती
- गट विकास अधिकारी
उत्तर : गट विकास अधिकारी
17. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता?
- एक वर्ष
- अडीच वर्ष
- पाच वर्ष
- साडेतीन वर्ष
उत्तर : अडीच वर्ष
18. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे?
- 4
- 5
- 6
- 2
उत्तर : 6
19. खालीलपैकी कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे?
- बल्ब
- ट्यूबलाईट
- सोडीयम व्हेपर लॅम्प
- यापैकी कोणतेही नाही
उत्तर : सोडीयम व्हेपर लॅम्प
20. चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे.
- दृष्टीभ्रम
- वातावरणीय अपवर्तन
- प्रकाशाचे विकीरण
- प्रकाशाचे अपस्करण
उत्तर : दृष्टीभ्रम