Rajyaseva Pre-Exam Question Set 5
Rajyaseva Pre-Exam Question Set 5
राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 1 : 5-04-2015
1. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ति संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?
- देवीसिंह चौहान
- दिगंबर कुलकर्णी
- विनायक विद्यालंकार
- नारायण पवार
उत्तर :नारायण पवार
2. ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?
- महात्मा गांधी
- सरोजिनी नायडू
- जवाहरलाल नेहरू
- तेज बहादूर सप्रु
उत्तर :सरोजिनी नायडू
3. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
- आर्य महिला समाज
- भारत महिला परिषद
- द मुस्लिम विमेन्स अॅसोसिएशन
- भारत स्त्री महामंडळ
उत्तर :भारत स्त्री महामंडळ
4. —– स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
- मुसलमानांच्या ईद सणावरून
- मुसलमानांच्या मोहरम सणावरुन
- बंगालच्या दुर्गा पूजेवरून
- योम किप्पुर सणावरून
उत्तर :मुसलमानांच्या मोहरम सणावरुन
5. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
- मिसीसिपी
- अमेझोन
- कोलोरॅडो
- बियास
उत्तर :कोलोरॅडो
6. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
- उष्णोदकाचे फवारे
- बॅथोलिथ
- डाईक
- घडया
उत्तर :घडया
7. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना —– यांचा पाठींबा होता.
- टिळक
- गांधीजी
- अली बंधु
- मोतीलाल नेहरू
उत्तर :गांधीजी
8. सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.
- अन्न उत्पादन
- दुग्ध उत्पादन
- मधुमक्षिका पालन
- फुलोत्पादन
उत्तर :मधुमक्षिका पालन
9. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
- वडाळा
- वाडीबंदर
- विलेपार्ले
- अंधेरी
उत्तर :विलेपार्ले
10. मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन —– राज्यांत होते.
- आसाम आणि बिहार
- बिहार आणि उत्तर प्रदेश
- कर्नाटक आणि तामिळनाडू
- काश्मीर आणि हिमाचल प्रदेश
उत्तर :आसाम आणि बिहार
11. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
- अरुणाचल प्रदेश
- छत्तीसगड
- हिमाचल प्रदेश
- गुजरात
उत्तर :हिमाचल प्रदेश
12. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
- दख्खनचे पठार
- अरेबियाचे पठार
- ब्राझिलचे पठार
- तिबेटचे पठार
उत्तर :तिबेटचे पठार
13. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?
- दक्षिण अमेरिका
- आफ्रिका
- आशिया
- युरोप
उत्तर :आफ्रिका
14. —– प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
- वनस्पती
- किटके
- मनुष्य
- प्राणी
उत्तर :किटके
15. खालीलपैकी कोणता वायु पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
- नायट्रोजन
- सल्फर डायऑक्साईड
- कार्बन डायऑक्साईड
- वरील सर्व
उत्तर :नायट्रोजन
16. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?
- कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952
- वीस कलमी कार्यक्रम
- राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
- नवीन लोकसंख्या धोरण 2011
उत्तर :राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
17. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?
- आर्टिकल 36
- आर्टिकल 46
- आर्टिकल 39
- वरीलपैकी एकही नाही
उत्तर :आर्टिकल 46
18. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?
- 85 कोटी
- 115 कोटी
- 200 कोटी
- वरीलपैकी एकही नाही
उत्तर :115 कोटी
19. 9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता.
- 4% व 5% अनुक्रमे
- 5% व 7% अनुक्रमे
- 4% व 7% अनुक्रमे
- 7% व 5% अनुक्रमे
उत्तर :4% व 5% अनुक्रमे
20. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?
- 10 वी पंचवार्षिक योजना
- 8 वी पंचवार्षिक योजना
- 12 वी पंचवार्षिक योजना
- 11 वी पंचवार्षिक योजना
उत्तर :10 वी पंचवार्षिक योजना