Rajyaseva Pre-Exam Question Set 7
Rajyaseva Pre-Exam Question Set 7
राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 2 : 5-04-2015
खाली दिलेले पारेच्छेद वाचा आणि प्रत्येक परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नमूद करा. या प्रश्नांची उत्तरे परिच्छेदावर आधारित असली पाहिजेत.
प्रश्न क्रमांक 1 ते 5 :
तेराव्या ते सोळाच्या शतकांदरम्यान युरोपातील संरजामदार वर्गाने भूदासांच्या पिळवणुकीतून भरपूर धन कामावले. या साठवलेल्या भांडवलाचा नवनवीन बाबतीत विनियोग केला गेला. नवीन भूप्रदेश आणि मार्ग शोधणार्या लोकांना त्यांनी आर्थिक पाठबळ दिले. कोलंबसने अटलांटिक महासागर ओलांडून नव्या जगाचा शोध लावला. वास्को द गामाने आफ्रिका खंडाला वळसा घालून भारत आणि पूर्वेशी व्यापाराचा सुरक्षित मार्ग शोधला. मॅगेलानच्या जहाजांच्या ताफ्यातील एक जहाज युरोपला परतल्यामुळे पृथ्वीला सागरी प्रदक्षिणा घालणे शक्य आहे हे सिद्ध झाले. साठवलेल्या भांडवलाचा आणखी एक उपयोग म्हणजे लिओनादी द व्हिन्सी, मायकेलांजेलो अनई राफाएल सारख्या महान कलाकारांना आश्रयदाते मिळाले. याकलाकारांनी चित्रकला आणि शिल्प कलेत क्रांती घडवली आणि मानवी शरीराचे अतिशय तपशीलवार चित्रण केले. आपल्या कलेमध्ये मानवी शरीराचे चित्रण तंतोतंत व्हावे यासाठी द व्हिन्सीसारख्या कलाकारांनी शरीरशास्त्राचाही अभ्यास केला.
या काळात केवळ शरीरशास्त्राचाच विकास झाला असे नाही. परिस आणि अमृत यांच्या शोधात असणार्या किमयेच्या अभ्यासकांना फॉस्फोरससारख्या मूलतत्वांचा शोध लागला आणि रसायनशास्त्राचा विकास झाला. कोपरनिकसने पृथ्वी नव्हे तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे असा सिद्धांत मांडला. गॅलिलिओ आणि केपलसारख्या वैज्ञानिकांनी त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी प्रयोग करत, प्रयोगाचा तपशील नोंदवत आणि या नोंदी त्या-त्या क्षेत्रात काम करणार्या इतरांना चिकीत्सेसाठी खुल्या ठेवत. माणसाकडे या जगात सुधारणा घडवण्याची जवळजवळ अमर्याद क्षमता आहे, असे त्यांना वाटत होते. या काळात चर्च धर्मसंस्था जरी अतिशय श्रीमंत आणि शक्तीशाली असली, तरी नियतीवर आंधळा विश्वास ठेवत जगण्याला या लोकांनी नकार द्यायला सुरुवात केली आणि चिकीत्सक वृत्तीचा उदय झाला. मानवतावादाच्या नवीन तत्वज्ञानाने माणसाच्या व्यक्तीगत क्षमता आणि प्रयत्नांवर भर दिला. युरोपीय अभ्यासकांनी अभिजात ग्रीक आणि रोमन ग्रंथांना पुनरुज्जीवित केले आणि गुटेनबर्गने विकसित केलेल्या छपाईच्या नव्या तंत्राच्या मदतीने त्यांना सगळीकडे लोकप्रिय केले. रेनेसां या शब्दाचा अर्थ आहे. पुनरुज्जीवन. या सगळ्या एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रियांना एकत्रपणे रेनेसां पुनरुज्जीवन म्हणतात.
1. पुनरुज्जीवन म्हणजे –
अ. ग्रीक व रोमन साहित्याची सुरुवात
ब. चिकित्सक वृत्तीचा उद्य
क. मानवतावादाचा विकास
ड. चर्च/धर्मसंस्थेचा र्हास
- वरील सर्व
- ब,क आणि ड
- अ,ब आणि क
- ब आणि क
उत्तर :ब आणि क
2. वरील उतार्यानुसार मानवतावादात कशाचा अंतर्भात होतो?
अ. व्यक्तीच्या भांडवलाचे महत्व
ब. व्यक्तीच्या प्रयत्नांचे महत्व
क. छपाईचे नवे तंत्र लोकप्रिय करणे
ड. माणसाच्या क्षमतेवर विश्वास
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
- अ,ब आणि ड
- ब,क आणि ड
- ब आणि ड
- अ आणि क
उत्तर :ब आणि ड
3. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ. पूर्वी पृथ्वी सूर्यमालेच्या मध्यभागी मानली जायची.
ब. चर्चची श्रीमंती नंतर कमी झाली.
- फक्त अ
- फक्त ब
- कोणतेही नाही
- अ आणि ब दोन्ही
उत्तर :फक्त अ
4. वरील उतार्यानुसार कोणती विधाने सत्य आहेत?
अ. विज्ञानाच्या विकासाचा कलांच्या विकासाशी निकटचा संबंध आसतो.
ब. शरीरशास्त्राचा अभ्यास चित्रकला व शिल्पकलेला आवश्यक आहे.
क. छपाई तंत्रज्ञानातील बदलांचा युरोपातील पुनरुज्जीवन घडवण्यात महत्वाचा सहभाग होता.
ड. भांडवल हे कला व वैज्ञानिक प्रगतीला चालना घेऊ शकते.
- वरील सर्व विधाने सत्य आहेत.
- अ, क आणि ड सत्य आहेत, ब सत्य नाही.
- अ, ब आणि ड सत्य आहेत, ड सत्य नाही.
- अ, ब आणि ड सत्य आहेत, क सत्य नाही.
उत्तर :अ, क आणि ड सत्य आहेत, ब सत्य नाही.
5. पुढील विधानांपैकी कोणती सत्य आहेत?
अ. गुटेनबर्गने छपाईयंत्राचा शोध लावला.
ब. नवीन मार्ग शोधण्याकरिता लागणार्या आर्थिक पाठबळासाठी यूरोपियन सरंजामदारांनी भूदासांची पिळवणूक केली.
- केवळ अ
- केवळ ब
- दोन्ही नाहीत
- अ व ब दोन्ही
उत्तर :दोन्ही नाहीत
प्रश्न क्रमांक 6 ते 10 :
मानवाला काही निसर्गदत्त हक्क असतात. जगातील सर्वच देशांमधील नागरिकांना ते प्राप्त झाले पाहिजेत या हेतूने ‘मानवी हक्क’ ही संकल्पना आधुनिक काळात प्रचलित झाली. जिवीत, उपजीविका यांच्या बरोबर भाषण, संघटना आणि धर्मश्रद्धा स्वातंत्र्य यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. इंग्लंडमध्ये 1215 मध्ये ‘मॅग्नाकार्टा’ या नावाने ओळखला जाणारा कायदा संमत झाला. तेव्हापासून राज्यसंस्थेच्या अधिकारावर बंधने असावीत ही कल्पना जन्माला आली. 1628 मधील पिटिशन ऑफ राईट्स आणि 1689 मधील बिल ऑफ राईटसने त्यात अधिक स्पष्टपणा आणला. अमेरिकन स्वातंत्र्य आणि अमेरिकेतील मूलभूत स्वातंत्र्याचा जाहीरनामा यातही मानवी हक्कांचे रक्षण हाही हेतु होता.
1948 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला आणि त्याच वेळेस भारतात स्वातंत्र्य मिळाल्यामुळे संविधान तयार करण्याचे काम सुरू होते. घटनाकारांवर या जाहीरनाम्यातील तरतुदींचा प्रभाव होता आणि म्हणूनच त्यातील काही तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या तिसर्या भागात केलेल्या आहेत. घटनेतील कलम 32 नुसार मानवी हक्क जे मूलभूत हक्क म्हणून नागरिकांना दिलेले आहेत त्यांचे उल्लंघन झाल्यास त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. आंतरराष्ट्रीय दबाब व घडामोडीमुळे 1993 मध्ये भारतात मानवी हक्क संरक्षण कयदा पारित करण्यात आला. या कायद्यानुसार राष्ट्रीय व राज्य मानव हक्क आयोगांची स्थापना करण्यात आली. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय किंवा राज्य मानव हक्क आयोगाकडे तक्रार करून दाद मिळू शकते.
भारतात स्त्रीयांचे मानवी हक्क उल्लंघन भरमसाठ प्रमाणावर होताना दिसते. स्त्रियांना मानवी हक्कांबाबत संवैधानिक तरतुदींबरोबर शासनाने विशेष कायदेही पारित केले असले तरी समाजाची मानसिकता ही पुरुषप्रधान असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. विख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी 1992 मध्ये ब्रिटिश जरनलच्या अंकात ‘मिसिंग वुमेन’ हा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी दहा कोटी स्त्रिया हरवल्या असा उल्लेख केला होता. हरवल्या म्हणजे जन्माला येण्याआधिच गर्भावस्थेत स्त्री गर्भ म्हणून त्यांची भ्रूणहत्या केली गेली. शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. त्या माध्यमातून स्त्रीयांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण शक्य आहे. विशाखा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळाबाबत दीलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजही बहुतांश रोजगाराच्या ठिकाणी लागू झालेली नाही. म्हणून समाजात आणि विशेषत: महिलांमध्ये महिलांविषयी कायद्यांची जागृती करणे गरजेचे आहे.
6. योग्य वाक्य निवडा.
अ. सर्व मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत.
ब. सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत.
क. सर्व मूलभूत हक्क हे मानव हक्क आहेत.
- फक्त अ बरोबर आहे
- अ आणि ब दोन्ही बरोबर आहे
- फक्त क बरोबर आहे
- सर्व बरोबर आहे
उत्तर :फक्त क बरोबर आहे
7. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ. स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन फक्त स्त्रियांचे शिक्षण रोखू शकते.
ब. दुसर्या कोणाहा पेक्षा स्त्रियांनी महिलाविषयक कायद्याबाबत अधिक जागृत असावयास हवे.
- फक्त अ
- फक्त ब
- कोणतेही नाही
- अ व ब दोन्ही
उत्तर :फक्त ब
8. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ. मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध लगेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.
ब. अमेरिकाना स्वातंत्र्य मानवी हक्कांच्या रक्षणाकरिताच मिळाले.
- फक्त अ
- फक्त ब
- कोणतेही नाही
- अ व ब दोन्ही
उत्तर :कोणतेही नाही
9. सर्व मूलभूत अधिकार हे
- वैश्विक जाहीरनाम्याचे भाग आहेत.
- फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून अंमबजावणी होऊ शकतात.
- सर्व व्यक्तींना दिलेले असून ते त्यांचे उल्लंघन झाल्यास दाद मागू शकतात.
- वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :वरीलपैकी कोणतेही नाही
10. महिला सबलीकरण यामुळे होऊ शकते.
- सक्तीचे कायदे तयार करून
- वैश्विक जाहीरनाम्याच्या माध्यमातून
- सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयामुळे
- वरील एकही नाही
उत्तर :वरील एकही नाही