राष्ट्रीय चळवळीचा सुरुवातीचा काळ
राष्ट्रीय चळवळीचा सुरुवातीचा काळ
Must Read (नक्की वाचा):
- 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दातील पराभवाने हे स्पष्ट झाले की जुनाट दृष्टिकोन आणि सामाजिक शक्ती यांच्या आधारावर केलेले उठाव आधुनिक साम्राज्यवादाचा पराभव करण्यास असमर्थ आहेत.
- त्यासाठी नव्या सामाजिक शक्ती, नव्या विचारसरणी, आधुनिक साम्राज्यवादाच्या योग्य आकलनावद आधारलेली आणि राष्ट्रव्यापी राजकीय कार्यासाठी जनतेला संघटित करु शकणारी आधुनिक राजकीय चळचळच आवश्यक होती.
- अशी चळवळ 19 व्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रवादी बुध्दिमतांनी प्रथम सुरु केली. पण या चळचळीचा सामाजिक पाया अगदीच अरुंद होता.
- मात्र ती नव्या राजकीय विचारप्रणाली, वास्तव परिस्थितीचे नवे आकलन आणि नव्या सामाजिक, आर्थिक व राजकीय उद्दिष्टांमुळे प्रेरित झाली होती.
- नव्या प्रकारच्या शक्ती व संघर्षाचे प्रकार, नेतृत्व करणारा नवा वर्ग आणि राजकीय संघटनेच्या नव्या तंत्राचे त्याद्वारा दर्शन झाले.
- या राजकीय चळवळीचा उदय होण्यास अनेक कारणे घडली. पण सर्वात महत्वाचा घटक म्हणजे भारतीय जनतेचे हितसंबंध आणि ब्रिटिश सत्तेचे हितसंबंध यामागील विरोध अधिकाधिक स्पष्ट होत गेला.
- या विरोधामुळेच भारतीय अर्थव्यवस्था व समाज अधिकाधिक प्रमाणात अविकसित होत चालला होता.
- त्यामुळे भारतीय आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बौध्दिक आणि राजकीय विकास अडून राहिला होता. संघटित राष्ट्रवादाचा उदय होण्यास कोणत्या शक्ती कारणीभूत झाल्या त्याचा आता थोडक्यात आढावा घेऊ.
बुध्दिवंतांची भूमिका :-
- प्रारंभी आधुनिक भारतीय विचारवंतांना या प्रक्रियेचे अकलन झाले. मात्र अंतर्विरोध असा की 19 व्या शतकाच्या प्रथमार्धात याच विचारवंताचा वासाहतिक राज्याबद्दलचा दृष्टिकोन अनुकूल स्वरुपाचा होता.
- त्यांची अशी धारणा होती की भारतीय समाजाची पुर्नरचना ब्रिटिश अंमलाखालीच होऊ शकेल, कारण त्या काळात ब्रिटन हाच सर्वात पुढाकारलेला देश होता.
- पूर्वापार मागासलेपणातून वर येण्यास ब्रिटिश भारताला मदत करतील, अशी त्यांना आशा वाटे.
- आधुनिक उद्योगधंदे व भारताचा आर्थिक विकास याबद्दल विचारवंतांना मोठा आकर्षण होते. त्यांना अशी आशा
- होती की ब्रिटन भारताचे औद्योगिकरण करील व येथे आधुनिक भांडवलशाही प्रस्थापित करील.
- लोकशाही, नागरी स्वातंत्र्य आणि जनतेचे सार्वभौमत्व यावर ब्रिटनची श्रध्दा असल्याने ते भारतात विज्ञान व तंत्रज्ञम्प्;ा
- ाान नव्याने आणतील, त्याद्वारा येथील जनतेची सांस्कृतिक व सामाजिक उन्नती होईल, असा त्याचा विश्र्वास होता.
- भारताचे ऐक्य साकार होत होते हे आणखी एक अकर्षण होते. परिणामी हा वर्ग 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात देखील ब्रिटिश सत्तेच्या पाठीशी राहिला.
- ब्रिटिशांची येथील सत्ता हा ज्ञानेश्र्वरी संकेतार्थ; आहे, असे ते मानू लागले.
- 19 व्या शतकाच्या द्वितीयार्धात मात्र या विचारवंतांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला कारण प्रत्यक्ष अनुभवांती त्यांना कळून चुकले की, त्याच्या आशा व्यर्थ होत्या.
- ब्रिटिश सत्तेचे स्वरुप आणि गुणविशेष याबद्दल त्यांनी जे आडाखे बांधले होते ते चुकीचे निघाले. या बुध्दिमंतांच्या लक्षात आले की ब्रिटिश वसाहतवाद भारतीय अर्थव्यवस्थेचे विघटन करीत असून आधुनिक पध्दतीची कारखानदारी आणि शेती येथे निर्माण होण्यास प्रतिबंध करीत आहे.
- लोेकशाही आणि स्वातंत्र्य यांना चालना देण्याऐवजी ब्रिटिशांची एकतंत्री सत्ताच कशी उपकारक आहे, हयाचे गोडवे गाण्यात येत आहेत.
- ब्रिटिशांनी जनतेच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले, नागरी स्वातंत्र्यावर बंधने घातली व ‘फोडा व राज्य करा’ हे धोरण ठेवले.
- अशा परिस्थितीत या विचारवंतांकडून कसली अपेक्षा होती, हळूहळू या बुध्दिमंतवर्गाने राजकीय शिक्षणासाठी व देशात राजकीय कार्य सुरु करण्यासाठी राजकीय संस्था निर्माण केल्या.
- भारतात राजकीय सुधारणा व्हाव्यात म्हणून चळवळ सुरु करणारे पहिले नेते म्हणजे राजा राममोहन रॉय.
- जनतेच्या हिसंबंधाच्या संवर्धनासाठी 1840 ते 1850 व 1850 ते 1860 दरम्यान ‘बेंगाल ब्रिटिश इंडियन सोसायटी’ व इतर संस्था स्थापन करण्यात आल्या पण या संस्था स्थानिक स्वरुपाच्या होत्या आणि त्यांच्यावर श्रीमंत व वरिष्ठ वर्गीयांचे वर्चस्व होते.
- नंतर 1870 ते 1880 दरम्यान मात्र केवळ राजकीय स्वरुपाच्या व मध्यमवर्गाचा आधार असलेल्या सार्वजनिक सभा पुणे (महाराष्ट्र), इंडियन असोशिएशन (बंगाल), महाजन सभा (मद्रास) आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन यासारख्या संस्था देशात सर्वत्र निर्माण झाल्या.
वासाहतिक राज्याची भूमिका :-
- इसवी सन 1876 ते 1880 पर्यंत लिटनच्या व्हाईसरॉयपदाच्या कारकिर्दीतचत जे प्रतिगामी धोरण अवलंबिण्यात आले त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाची झपाटयाने प्रगती झाली. लिटनच्या प्रतिगामी धोरणांची काही उदाहरणे अशी
* इसवी सन 1878 च्या शस्त्रविषयक कायद्याच्या एका फटकार्याने सार्या हिंदी जनतेला नि:शस्त्र करुन टाकले.
*‘व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट’ 1878 अन्वये ब्रिटिश सत्तेवर होणारी वाढती टीका दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
* इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षेस बसण्याची वयोमर्यादा 21 वरुन 19 वर आणल्याने भारतीयांना हया सेवेत प्रवेश करण्याची संधी आणखीच कमी झाली.
* भारतात भीषण दुष्काळ पडला असताना इसवी सन 1877 मध्ये प्रचंड खर्च करुन राजेशाही दरबार भरविण्यात आला आणि अफगाणिस्तानचे खर्चिक युध्द सुरु करुन त्याचा आर्थिक बोजा भारतीय तिजोरीवर टाकण्यात आला.
* ब्रिटनमधून जे कापड भारतात येई त्यावरील आयात जकात काढून टाकण्यात आली. त्यामुळे नव्यानेच वर येऊ पाहात असलेल्या भारतीय वस्त्रोद्योगावर संकट कोसळले.
- ही सर्व उदाहरणे ब्रिटिश सत्तेचे वसाहतवादी स्वरुप स्पष्ट करणारी आहेत. इसवीसन
- 1883 मध्ये नवा व्हाईसरॉय रिपन याने इलर्बट’ बिल संमत करुन वर्णीय पक्षपाताचे एक ढळढळीत उदाहरण दूर केले व भारतीय जनतेच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला. या बिलाद्वारा युरोपियनांवरील फौजदारी खटलेही भारतीय जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे चालतील असे ठरविण्यात आले.
- पण भारतातील युरोपियनांनी या बिलाविरुध्द एवढे आकांडतांडव केले की अखेर त्यात दुरुस्ती करावी लागली.
- भारतीय राष्ट्रवादाची वाढ होण्याच्या दृष्टीने या घटनांमुळेच योग्य वातावरण निर्माण झाले.
भारतीय राष्ट्रीय सभेचा (इंडियन नॅशनल काॅंग्रेसचा) उदय :-
- परकीय सत्ता व पिळवणूक यांच्याविरुध्दच्या सर्व भारतातील राजकीय कार्यात एकसूत्रीपणा आणावा आणि ते संघटित करण्याच्या दृष्टीने एक अखिल भारतीय स्थापावी हयासाठी हीच वेळ योग्य होती.
- यादृष्टीने अनेक प्रयत्न बरीच वर्षे चालू होते. इंडियन असोसिएशनची स्थापना करुन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला. अखेर हया कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.
- ए.ओ. हयूम निवृत्त सनदी अधिकार्याशी सहकार्य करुन दादाभाई नौरोजी, न्या, मू. महादेव गोविंद रानडे, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी हयांनी 1885 च्या डिसेंबरमध्ये मुंबईत इंडियन नॅशनल काॅंग्रेसचे अधिवेशन भरविले.
- अशा रीतीने भारतीय स्वातंत्र्यलढयाची सुरवात अगदी लहानशा प्रमाणात झाली.
- प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवादी नेत्यांचे असे मत होते की, स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष लढा देण्याची वेळ अद्याप आलेली नाही.
- प्रथमत: अशा लढयाची पायाभरणी करायला हवी. प्रारंभीच्या या भारतीय राष्ट्रवादी नेत्यांची मूळ उद्दिष्टे कोणती हे समजावून घेण्यास उत्सुक असाल.
(क) राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करणे हे प्रारंभीच्या काळातील राष्ट्रवादी नेत्यांचे एक प्रमुख उद्दिष्ट होते. भारताची एक राष्ट्र म्हणून बांधणी करणे, एससंध भारतीय जनमत तयार करण्े आणि भारतीय लोक कधीच एक नव्हते, तरन ते शेकडो वंश, भाषा, जाती आणि धर्म यांचे कडबोळे आहे, असा जो आरोप साम्राज्यवादी करीत असत. त्याला चोख उत्तर देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
(ख) त्यांचे दुसरे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे एका राष्ट्रीय राजकीय व्यासपीठाच्या निर्मितीचे सर्व भारतीयांचे ज्यावर एकमत होईल, असा एक कार्यक्रम तयार करुन अखिल भारतीय राजकीय कार्याची त्यांना पायाभरणी करावयाची होती.
(ग) भारतीय जनतेला राजकीयदृष्टया जागृत करणे, राजकीय प्रश्नांबद्दल जनमानसांत आस्था निर्माण करणे आणि भारतातील जनतेत प्रबोधन करुन तिला संघटित करणे हे तिसरे प्रमुख उद्दिष्ट होते.
(घ) अखिल भारतीय नेतृत्वाची जडणघडण करणे हेही त्या काळातील आणखी एक उद्दिष्ट होते. असे एकत्रित नेतृत्व असल्याखेरीज कोणत्याही चळचळीची प्रगती होत नाही. 1880 पूर्वीच्या काळात असे नेतृत्वच अस्तित्वात नव्हते. हयाखेरीज राजकीय कार्यासाठी सामान्य राजकीय कार्यकत्र्यांना शिकवून तयार करावयाचे होते.
- अशा रीतीने व्यापक आधारावर व अखिल भारतीय पातळीवर वसाहतवादविरोधी राष्ट्रवादी चळवळी निर्माण कराव्यात, अशी प्रारंर्भीच्या राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे होती.