राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती
राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती
- देशातील किशोर लोंकसंख्येबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबच त्यांना कुपोषनापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने 7 जानेवारी 2015 रोजी राष्ट्रीय किशोर आरोग्य कार्यक्रम (RKSK) सुरू केला आहे.
- या कार्यक्रमात 10 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत देशाच्या लोकसंख्येपैकी 21 टक्क्या पेक्षा जास्त लोकसंख्या आहे.
- 24.3 करोड किशोर मुला-मुलींच्या समस्याकडे व्यापक स्वरुपात लक्ष दिले जाईल. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य क्षमता विकसित करण्यासाठी त्यांचे आरोग्य आणि त्यांचे कल्याण या संबंधी निर्णय घेण्याकरिता मदतीसाठी या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
- 10 ते 19 वयोगटातील 24.3 करोड किशोर मुला-मुलींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमांतर्गत त्यांना पोषण, प्रजनन, आरोग्य आणि संकट या पासून त्यांचे संरक्षण करणे.
- या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश किशोर प्रजनन स्वास्थ उत्तम राखणे.
- किशोरांमध्ये मुलगा-मुलगी, विवाहित-अविवाहित, गरीब-श्रीमंत, शाळेतील मुलं-मुली, शाळा सोडलेली मूल-मुली या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.
- या कार्यक्रमात प्रजनन, मातृत्व, शिशु बालआरोग्य आणि किशोर यांच्यावर विशेष लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.
- कार्यक्रमाची सुरुवात सरकारी दवाखान्यांच्या मदतीने केली जाणार आहे.
- या कार्यक्रमात 6 (C)यावर जोर दिला आहे.
1. Coverage 2. Content 3. Communication 4. Counseling 5. Clinics 6. Convergence