राष्ट्रीय युवक धोरण 2014
राष्ट्रीय युवक धोरण 2014
- भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो.
- 2011 च्या जनगणनेनुसार 15 ते 29 या वयोगटातील युवकांची संख्या 27.5 टक्के आहे. म्हणूनच राष्ट्रीय धोरण निश्चित करत असताना युवकांचा कौशल्यांना पुर्णपणे वाव मिळावा हा उद्देश केंद्रस्थानी मानून केंद्र सरकारने स्वामी विवेकानंदच्या 150 व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून ‘राष्ट्रीय युवा धोरण 2014’ जाहीर केले.
- या धोरणानुसार युवकांची वयोमार्यादा 15 ते 29 अशी करण्यात आली आहे.
- युवकांच्या कौशल्यांचा विकास करून भारताच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी श्रमिक शक्ती यंत्रणा तयार करणे, हे या धोरणांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- विशेषत: शिक्षण, रोजगार व कौशल्य विकास, उधोजकता या क्षेत्रांवर अधिक भर देणे अपेक्षित आहे.
- तसेच सुदृढ व निरोगी पिढी तयार करण्यासाठी आरोग्य सुविधा, क्रीडा यांमधून प्रोत्साहन देणे, राष्ट्र उभारणीसाठी सामाजिक विचार मूल्य आणि समुदाय विकास यांना प्रोत्साहित करणे, राजकारण आणि प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग वाढवून नागरी एकात्मता आणि सहभागाचे सुलभीकरण करणे अपेक्षित आहे.
- वंचित आणि दुर्लक्षित युवकांवर लक्ष्य, सर्व स्तरावरील युवकांच्या विकासास प्रोत्साहन देणे अशी विविधांगी उद्दिष्टे या धोरणामध्ये अंतर्भूत आहेत.