संबंधी सर्वनाम व त्याचे उपयोग
Must Read (नक्की वाचा):
- खालील वाक्यांच्या जोडया (Pairs) वाचा –
- I met Hari, Hari had just returned.
- I have found the pen. I had lost the pen.
- Here is the book. You lent me the book.
- आता आपण वरील जोडयांपैकी प्रत्येक जोडीचे एक वाक्य तयार करू या :
- I met Hari who had just returned.
- I have found the pen which I had lost.
- Here is the book that you lent me.
- आता who, which आणि that यातील प्रत्येक शब्दाचे कार्य अभ्यासू या :
- Who हा शब्द Hari या नामाऐवजी वापरला आहे. म्हणून तो सर्वनामाचे (Pronoun) कार्य करतो.
- Who हा शब्द दोन विधानांना जोडतो. म्हणून हा उभयान्वयी अव्ययाचे (Conjenction) कार्य करतो.
- म्हणजेच who हा शब्द दोन कार्ये करतो. सर्वनामाचे आणि उभयान्वयी अव्ययाचे (conjunction) म्हणून आपण त्याला ‘उभयान्वयी सर्वनाम’ (Conjuctive Pronoun) म्हणू शकतो.
- असे असले तरी त्याला संबंधी सर्वनाम (Relative Pronoun) असे म्हणतात. कारण ते आधी आलेल्या नामाशी (येथे Hari हे नाम आहे.) असलेला संदर्भ किंवा संबंध दर्शविते. येथे नाम हे संबंधी सर्वनाम (antecedent) आहे.
- दुसर्या व तिसर्या वाक्यात which आणि that हीसुद्धा संबंधी सर्वनामे (Realative Pronoun) का आहेत?
- दुसर्या आणि तिसर्या वाक्यात संबंधी सर्वनामे कोणती आहेत ते ओळखा.
संबंधी सर्वनामांची रुपे (FORMS OF THE RELATIVE PRONOUNS) :
- संबंधी सर्वनाम who ची व्दितीया विभक्तीत (Accusative) आणि षष्ठी विभक्तीत (Genitive) भिन्न रुपे होतात.
एकवचनी आणि अनेकवचनी
(Singular and Plural)
- Nominative – प्रथमा : who
- Genitive – षष्ठी : whose
- Accusative – व्दितीया : whom/who
उदा.
1. This is the boy (or girl) who works hard.
2. This is the boy (or girl) whose exercise is done well.
3. This is the boy (or girl) whom/who all praise.
4. These are the boys (or girls) who work hard.
5. These are the boys (or girls) whose exercises are done well.
6. These are the boys (or girls) whom/who all praise.
- असे लक्षात येते की, एकवचनी व अनेकवचनी रुप आणि स्त्रीलिंगी पुल्लिंगी रूप समान आहेत.
- Which या संबंधी सर्वनामाचे प्रथमा वा व्दितीया विभक्तीतील रुपे समान आहे.
- This is the house which belongs to my uncle.
- The house which my uncle built cost him Rs. 3,50,000
- which या संबंधी सर्वनामाची षष्ठी विभक्ती होत नाही. परंतु ‘of which’ साठी पर्यायी सर्वनाम म्हणून ‘whose’ वापरतात जसे –
- A triangle whose three sides are equal is called an equilateral triangle.
- ‘that’ या संबंधी सर्वनामाचे एकवचनी व अनेकवचनी रूप आणि प्रथमा व्दितीया विभक्तीतील रूप समान आहे.
- याची षष्ठी विभक्ती होत नाही.
- He that is content is rich.
- इंग्रजीच्या अनौपचारिक प्रयोगात whom च्या ठिकाणी who चा वापर उपयोग केला जातो.
- They that touch pitch will be defiled.
- Take anything that you like.
- ‘What’ हे संबंधी सर्वनाम एकवचानातच वापरतात आणि प्रथमा व व्दितीया विभक्तीतील याचे रूप समान आहे.
- What has happened is not clear.
- I say what I mean.
- He failed in what he attempted.
संबंधी सर्वनामांचा उपयोग (USE OF THE RELATIVE PRONOUNS) :
- सामान्य नियम म्हणून, who चा वापर केवळ व्यक्तीसाठी होतो. ते एकवचनी किंवा अनेकवचनी नामाचा उल्लेख करते (पाहा $150)
उदा.
- The man who is honest is trusted.
- Blessed is he who has found his work.
- He prayeth best who loveth best.
- He who hesitates is lost.
- They never fail who die in a great cause.
- They are slaves who dare not be
- In the right with two or three.
- कधी-कधी who प्राण्यांचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. whose (who चे षष्ठीतील रूप) हे व्यक्ती, प्राणी आणि निर्जीव वस्तूंसाठीदेखील वापरतात.
उदा.
- The sun, whose rays give life to the earth, is regarded by some people as a god.
- This is the question whose solution has baffled philosophers of all ages.
- [More properly, ‘This is the question the solution of which has baffled philosophers of all ages’.]
- (असे म्हणणे अधिक योग्य आहे.)
- Which हे सर्वनाम निर्जीव वस्तु व प्राण्यांसाठी वापरतात. ते एकवचनी किंवा अनेकवचनी नामाचा उल्लेख करते.
- The moment which is lost is lost for ever.
- The books which help you most are those which make you think most.
- The horse which I recently bought is an Arab.
- ‘Which’ हे एखाधा वाक्याचा उल्लेख करण्यासाठीदेखील वापरतात.
उदा.
- The man was said to be drunk, which was not the case.
- He said he saw me there, which was a lie.
- He is here, which is fortunate.
- पूर्वीच्या काळी ‘which; हे व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी वापरत असत.
- उदा. Our Father, which art in heaven.
- टीप : ‘who’ आणि ‘which’ या संबंधी सर्वनामाचा खालीलप्रमाणे वापर करता येतो.
i. पूर्वगामीला मर्यादित करण्यासाठी (limit) सीमित करण्यासाठी किंवा त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी, म्हणजे जेथे संबंधी सर्वनामाने सुरू झालेले उपवाक्य (clause) मर्यादा (restrictive) दर्शविणारे किंवा त्याचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी असते.
उदा.
- The man who had cheated me was yesterday arrested by the police.
- The book which you see on the table cost me ninety rupees.
ii. पूर्वगामीविषयी अधिक माहिती देण्यासाठी म्हणजेच, जेथे संबंधी सर्वनामाने सुरू झालेले उपवाक्य सलगता दर्शविणारे (Continuative) व अर्थ स्पष्ट करणारे (defining) असते.
उदा.
- The teacher sent for the boy, who(=and he) came at once.
- I gave him a rupee, which(=and it) was all I had with me.
लक्षात घ्या की, अर्थ स्पष्ट न करणारी (non-defining) उपवाक्ये मुख्य वाक्यापासुन स्वल्पविरामाने (comma) वेगळी करतात.
तुलना करा –
- My brother who is a doctor has gone t America.
- My brother, who is a doctor, has gone to America.
- पहिले वाक्य असे सूचित करते की, वक्त्याला अनेक भाऊ आहेत; आणि ‘who is a doctor’ हे उपवाक्य त्यातील एकाला वेगळे करते. दुसर्या वाक्यात उपवाक्य अर्थ स्पष्ट करत नाही आणि वक्त्याला एकच भाऊ आहे असे सूचित करते.
- That व्यक्ती किंवा वस्तूंसाठी वापरतात. ते एकवचनी किंवा अनेकवचनी नामाचा उल्लेख करते. (बघा $151) That ची षष्ठी विभक्ती होत नाही आणि त्याच्या आधी कधीही शब्दयोगी अव्यय (Preposition) येत नाही.
- This is the boy that I told you of.
- I know the house that he lives in.
- Uneasy lies the head that wears a crown.
- I have lost the watch that you gave me.
- Thrice is he armed that hath his quarrel just.
- A city that is set on a hill cannot be hid.
- He that is not with me is against me.
- Happy is the man that findeth wisdom.
- He that is slow to anger is better than the mighty.
- The crowd that gathered cheered him to the echo.
- Who that has met him can escape his infuence?
- All that I said had no effect on him.
- He was the most eloquent speaker that I ever heard.
- असे लक्षात येईल की, that हे संबंधी सर्वनाम फक्त अर्थ स्पष्ट करणार्या उपवाक्यांमध्ये (defining clauses) वापरतात.
- म्हणजेच (Antecedents) ला मर्यादित (सीमित) करणारी किंवा त्याचा अर्थ स्पष्ट करणारी उपवाक्ये.
- That चा वापर व्दितीयेतील क्रियाविशेषणे = on which, in which, at which म्हणून करता येतो.
- I remember the day that he came.
- On the day that thou eatest there of thou shalt surely die.
- That या संबंधी सर्वनामाला मर्यादा असल्यामुळे (restroctive force) ते कधी-कधी who किंवा which ला पर्यायी म्हणून अयोग्य ठरते. तेव्हा मी असे म्हणू शकत नाही –
- My father, who is a schoolmaster, is fifty years old.
- मी म्हटले पाहिजे – My sister that has been adpted by my uncle is ill.
- पण जर मला एकापेक्षा अधिक बहिणी असतील, तर मी म्हणू शकतो की – My sister that has been adpted by my uncle is ill.
- that हे संबंधी सर्वनाम खालील बाबतीत who किंवा which ऐवजी प्राधान्याने वापरले जाते.
1. Sperlative Degree तमभावामध्ये विशेषणानंतर
उदा.
- He was the most eloquent speaker that I ever heard.
- The wisest man that ever lived made mistakes.
- This is the best that we can do.
2. All, some, any, none, nothing, (the) only या शब्दानंतर
उदा.
- All is not gold that glitters.
- He is the same man that he has been.
- It is only donkeys that bray.
- It was not for nothing that he studied philosophy.
- Man is the only animal that can talk.
3. प्रश्नार्थक सर्वनाम who aani what नंतर
उदा.
- Who thta saw her did not pity her?
- Who am I that I should object?
- What is it that troubles you so much?
- What is there that I do not know?
4. अशा दोन (Antecedents) नंतर ज्यातील एक व्यक्ती आणि दुसरे प्राणी किंवा वस्तु दर्शविते.
उदा.
- The boy and his dog that had trespassed on the club premises were turned out.
- ‘What’ हे फक्त वस्तूंचा उल्लेख करते. पूर्वगामी (antecedent) शिवाय हे वापरतात आणि ‘what’ व that which (किंवा thing which) हे समतूल्य आहेत.
- What(=that which) connot be cured must be endured.
- I say what(=that which) I mean.
- I mean what I say.
- What is done cannot be undone.
- What man has done man can do.
- What is one men’s meat it another man’s poison.
- Give careful heed to what I say.
- What I have written, I have written.
- He found what he was looking for.
- असे लक्षात येईल की, what हे एकवचनी प्रथमा व व्दितीया विभक्तीय वापरतात.
- जुन्या इंग्रजीमध्ये such नंतर as हा शब्द संबंधी सर्वनाम म्हणून वापरला जातो.
- Tears such as angles weep burst forth.
- These mangoes are not such as I bought yesterday.
- He is such a man as I honour.
- We have never had such a time as the present.
- His answer was such as I expected him to give.
- As हा शब्द same या शब्दानंतर संबंधी सर्वनाम म्हणून वापरला जातो.
उदा.
- My trouble is the same as yours [is].
- This is not the some as that [is].
- [But] I played with the same bat that you did.
- ‘The same as’ चा अर्थ बहुतांशी ‘of the same kind’ असा होतो.
- ‘The same ….. that’ म्हणजे ‘One and the same’
- जेव्हा ‘as’ नंतर विशेषण येते तेव्हा ‘as’ हा शब्द संबंधी सर्वनामाप्रमाणे वापरतात.
- उदा. I collected as many specimens as I could find.
- टीप : येथे पहिला as हा क्रिया विशेषण आहे.
- जुन्या इंग्रजीमध्ये but हा शब्द संबंधी सर्वनाम म्हणून नकारानंतर वापरतात.
उदा.
- There is none but will agree with me. (but will agree=who will not agree).
- There is no Hindu but knows the story of the Ramayana (That is, there is no Hindu who does not know, etc.)
- There is no man but wishes to live.
- There is no rose but has some thorm. (but=which…no)
- There is scarcely a child but likes candy.
- There is no man but knows these things. (but=who does not.)
- असे दिसते की, येथे ‘but’ हे सर्वनाम आण who…not, which…not समतुल्य आहेत.
संबंधी सर्वनामाचे स्थान (POSITION OF THE RELATIVE PRONOUN) :
- संदिग्धता टाळण्यासाठी (ambiguity) संबंधी सर्वनामाचे स्थान त्याचा antecedent च्या शक्य तेवढे जवळ असले पाहिजे.
- उदा. The boy who won the first prize in English is the son of my friend, Mr.Joshi.
- संबंधी सर्वनामाला त्याच्या antecedent पासून वेगळे केल्यास त्याचा अर्थ काही वेगळाच होईल.
- The boy is the son of my friend Mr.Joshi who wo the first prize.
- या प्रमाणेच “I have read Gokhale’s speeches, who was a disciple of Ranade” या सारखे वाक्य बदलून “I have read the speeches of Gokhale, who was a disciple of Ranade” असे केले तर जास्त अर्थपूर्ण होईल. तसे खालील वाक्य करावयास हवे.
- I with my family reside in a village near Pune which consists of my wife and three children.
संयुक्त संबंधी सर्वनामे (COMPOUND RELATIVE PRONOUNS) :
- Who, which आणि what हा ever, so ever लावल्यास होणार्या सर्वनामांना संयुक्त संबंधी सर्वनामे (Compound Relative Pronouns) असे म्हणतात.
- ती पुढीलप्रमाणे आहेत –
- Whosoever(=any and every person who) exalteth himself shall by abased.
- Whoso diggeth a pit shall fall therein.
- Whatsoever thy hand findeth to do, do it with thy might.
- आजकाल whosever, whichever, whatever ही रुपे सामान्यत: वापरतात.
उदा.
- Whoever (i.e., any person who) comes is welcome.
- Take whichever (i.e., any which) you like.
- I will take with me whomsoever you choose.
- Whatever (i.e, anything which) he does, he does well.