RRB Question Set 32
RRB Question Set 32
प्रमाण भागीदारी प्रश्नसंच
1. रमेश व राजेश यांनी अनुक्रमे 9000 व 12000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 6
महिन्यानंतर राजेशने त्याचा अर्धी गुंतवणूक काढून घेतली. एक वर्षांनंतर दोघांनाही एकूण नफा 9200
रुपये झाला. तर राजेशचा नफा किती असेल? (एसटी महामंडळ 2014)
- 4000
- 4200
- 4400
- 4600
उत्तर : 4600
2. स्नेहल ने 8000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. दिपकने 5 महिन्यानंतर 10000 रुपये
गुंतवून भागीदारी स्विकारली. एक वर्षांनंतर त्यांना 8300 नफा झाला तर स्नेहलचा वाटा किती?
- 5800
- 2400
- 4800
- 6400
उत्तर : 4800
3. सचिनने 900 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. राहुलने तीन महिन्यानंतर 15000 रुपये गुंतवून
भागीदारी स्विकारली. सचिनला 400 रुपये नफा झाला तर राहुलचा वाटा किती?
- 6000
- 5000
- 3000
- 7000
उत्तर : 5000
4. अक्षय व दिव्या यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 1:5 आहे तर त्यांच्या
भांडवलाचे गुणोत्तर किती?
- 15:4
- 4:15
- 5:3
- 3:5
उत्तर : 15:4
5. रानी आणि सुभाष यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 3:2 आहे. तर
नफ्याचे गुणोत्तर काढा.
- 3:5
- 4:5
- 5:3
- 5:4
उत्तर : 3:5
6. संदीप व नागेश यांच्या नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 2:5 आहे. संदीपचे
भांडवल 20000 रुपये आहे तर नागेशचे भांडवल किती?
- 24000
- 25000
- 30000
- 28000
उत्तर : 28000
7. राखी 16000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करते. मनीषा 6 महिन्यानंतर काही रक्कम गुंतवून
भागीदारी स्विकारते. त्यांना एक वर्षांनंतर अनुक्रमे 8000, 5000 रुपये नफा होतो. तर मनीषाने किती
रक्कम गुंतवली होती?
- 30000
- 40000
- 20000
- 250000
उत्तर : 20000
8. R व S दोघेही अनुक्रमे 12000, 14000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. त्यांना 5200 रुपये
नफा होतो. तर त्यांच्या नफ्यातील अंतर किती?
- 400
- 450
- 500
- 600
उत्तर : 400
9. w,x,y अनुक्रमे एक व्यवसायात 6000, 9000, 12000 रुपये गुंतवतात. x ला 1500 रुपये नफा होतो
तर y चा वाटा किती?
- 2000
- 3000
- 4000
- 5000
उत्तर : 2000
10. मनोज 3000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. राज 8 महिन्यानंतर 15000 रुपये गुंतवून
भागीदारी स्वीकारतो त्यांना 2 वर्षांनंतर 3900 रुपये नफा होता तर मनोजचा वाटा किती?
- 12000
- 300
- 600
- 900
उत्तर : 900
11. नीलेश व रमेश 7000 व 14000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. रमेशला 5000 रुपये
नफा होता तर निलेशचा वाटा किती?
- 2500
- 3500
- 4500
- 4000
उत्तर : 2500
12. सीताराम 24000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. रघु 4 महिन्यानंतर 30000 रुपये गुंतवून
भागीदारी स्विकारतो. त्यांना एक वर्षांनंतर 11000 रुपये नफा होतो तर रघुचा वाटा किती?
- 2500
- 5000
- 6000
- 4000
उत्तर : 5000
13. राकेश व नरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर अनुक्रमे 9:11 आहे. त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे.
तर नफ्याचे गुणोत्तर किती?
- 18.33
- 6.11
- 11:6
- 33.18
उत्तर : 6.11
14. जनार्धन 17000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. 4 महिन्यानंतर अशोक 51000 रुपये
गुंतवून भागीदारी स्विकारतो त्यांना 2 वर्षांनंतर 21000 रुपये नफा होतो. तर त्यांच्या नफ्यातील अंतर
किती?
- 6000
- 9000
- 15000
- 18000
उत्तर : 9000
15. राम व मनोज अनुक्रमे 30000 व 40000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. 10
महिन्यानंतर मनोज त्यातील अर्धी रकम काढून टाकतो. एक वर्षानंतर रामाला 1800 रुपये नफा होतो.
तर मनोजचा वाटा किती?
- 2200
- 22000
- 2400
- 3000
उत्तर : 2200
16. 4000 आणि 9000 रुपये गुंतवून x आणि y व्यवसाय सुरू करतात. x ला या व्यवसायात 1200
रुपये नफा होतो. तर दोघांनाही होणारा एकूण नफा किती?
- 2700
- 1200
- 3900
- 2900
उत्तर : 3900
17. Y आणि Z एका व्यवसायात अनुक्रमे 60000, 80000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात. 4
महिन्यानंतर Y आर्धी रकम काढून घेतो. एक वर्षानंतर त्यांना 18000 नफा होतो तर Y चा वाटा किती?
- 12000
- 6000
- 18000
- 10000
उत्तर : 12000
18. नागेश, सचिन अनुक्रमे एका व्यवसायात 15000, 40000 रुपये गुंतवतात. 6 महिन्यानंतर सचिन
अर्धी रक्कम काढून घेतो. त्यांना एक वर्षांनंतर 12000 नफा होतो. तर नागेशचा वाटा किती?
- 6000
- 4000
- 8000
- 10000
उत्तर : 4000
19. A 10000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. 4 महिन्यानंतर B 16000 रुपये गुंतवून
भागीदारी स्विकारतो. त्यांना 3 वर्षांनंतर 10900 नफा होतो तर A चा वाटा किती?
- 4600
- 4500
- 6400
- 5400
उत्तर : 4500
20. नरेन 32000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतो. गुरुदेव 6 महिन्यानंतर 40000 रुपये गुंतवून
भागीदारी स्विकारतो. 2 वर्षांनंतर त्यांना 12400 नफा होतो. तर नरेनचा वाटा किती?
- 6400
- 6000
- 5400
- 5000
उत्तर : 6400