सहकाराची तत्वे
सहकाराची तत्वे
- इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance – ICA) स्थापना झाली.
- ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.
- सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.
- मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली. या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.
मूलभूत तत्वे
- ऐच्छिक सभासदत्व
- लोकशाही संघटन
- गुंतविलेल्या पुंजीवर व्याज
- धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटप
- सभासद शिक्षण
- सहकारी संस्थातील सहकार्य
सामान्य तत्वे
- रोखीने व्यवहार
- राजकीय व धार्मिक अलिप्तता – हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.
- काटकसर
- स्वावलंबन व परस्पर मदब
- सेवा भाव