सहकारी संस्थांचे प्रकार
सहकारी संस्थांचे प्रकार
- सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.
कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives)
- भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.
- ग्रामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.
- जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
- राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक). तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.
बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives)
उदा.
- नागरी सहकारी बँका
- पगारदार नोकरांच्या पतसंस्था
- प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.
कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives)
उदा.
- सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योग
- सहकारी सूत गिरण्या
- सहकारी दूध उत्पादक संस्था
- सहकारी तेलप्रक्रिया संस्था
- कृषी खरेदी-विक्री संघ
- कृषी सहकारी पणन संस्था
- प्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.
बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives)
उदा.
- सहकारी ग्राहक भांडारे.
- सहकारी गृहनिर्माण संस्था.
- पावरलुम विणकर सह. संस्था.
- चर्मकार सह. संस्था.
- कुंभार सह. संस्था इ.