सह्याद्रि पर्वत आणि पश्चिम घाट (Sahyadri Mountain and West Pier
सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
स्थान : महाराष्ट्राच्या पश्चिम भागातअरबी समुद्राला समांतर 40 ते 80 km. अंतरावर दक्षिनोत्तर सह्याद्रि पसरला आहे.
यालाच पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते.
विस्तार : उत्तरेस तापी नदीच्या खोर्यापासुन दक्षिणेस कन्याकुमारीपर्यन्त
लांबी : दक्षिणोत्तर = 1600 km., महाराष्ट्रातील लांबी = 440 km.
उंची : सरासरी उंची 900 ते 1200 मी.
उतार : या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय तीव्र व पूर्व उतार एकदम मंद स्वरूपाचा आहे.
रुंदी : सह्याद्रीची रुंदी उत्तरेस जास्त व दक्षिणेस कमी आहे. तसेच उत्तरेस उंची जास्त व दक्षिणेस कमी आहे.
Must Read (नक्की वाचा):
सह्याद्रि पर्वत :
सह्याद्रि पर्वताची निर्मिती ‘प्रस्तरभंग’ प्रक्रियेतून झाली. या प्रक्रियेत दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील भाग मोठ्या प्रमाणात खचला. त्याचबरोबर
पश्चिम किनारा व किनार्यालगतचा सागरतळ मोठ्या प्रमाणावर खचला.
स्थान : दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.
सह्याद्रि पर्वतावरील भुरुपे :
सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत.
उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :
शिखर ———–ऊंची ———जिल्हा
- कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर
- साल्हेर ——1567मी.—— नाशिक
- महाबळेश्वर –1438मी.—— सातारा
- हरिश्चंद्रगड –1424मी. ——-नगर
- सप्तश्रुंगी —-1416मी.——- नाशिक
- तोरणा——-1404मी.——- पुणे
- अस्तंभा —— – ———नंदुरबार
- त्र्यमबकेश्वर- 1304मी.——- नाशिक
- तौला ——-1231मी. ——–नाशिक
- बैराट ——1177मी. ——–गविलगड टेकड्या अमरावती
- चिखलदरा –1115मी.——– अमरावती
- हनुमान—- 1063मी.——— धुले
किल्ले :
सह्याद्रि पर्वताच्या अनेक दुर्गम भागात घाटमाथ्यावर शिवाजी महाराज्यांच्या काळात किल्ले बांधले गेले.
- नाशिक : गाळणा, अलंग-कुलंग, मुंगी- तुंगी, चांदवड, साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, मदनगड-बीदनगड, घोडप.
- अहमदनगर: हरिश्चंद्रगड, रतनगड.
- पुणे : सिंहगड , पुरंदर, राजगड, तोरणा, विसापूर, राजमाची, शिवनेरी, वज्रगड, प्रचंडगड, लोहगड.
- कोल्हापूर : पन्हाळा, विशालगड, भुदरगड, गगनगड.
- सातारा : प्रतापगड, पांडवगड, अजिंक्यगड, सज्जनगड, वर्धनगड, कळमगड, वैराटगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड.
घाट (खिंड):
पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)
- मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर
- नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान
- कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत
- वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड
- कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर
- चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे
- सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर
- बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा
- मांजरसुभा घाट बीड बीड – नगर
- अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर
- ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण
- धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई
- बोर घाट पुणे पुणे – मुंबई
- ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा
- दिवा घाट पुणे पुणे – बारामती
- कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण
- आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी
- आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव
- फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी
- पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर
पठारे (थंड हवेचे ठिकाण)
सह्याद्रि पर्वताच्या व त्यांच्या शिखरांच्या काही भागात उंच ठिकाणी सपाट पठारी प्रदेश आहेत; त्यांनाच घाटमाथा असे म्हणतात.
ठिकाण जिल्हा पर्वतप्रणाली
- आंबोळी सिंधुदुर्ग सह्याद्रि
- महाबळेश्वर सातारा सह्याद्रि
- पाचगणी सातारा सह्याद्रि
- माथेरान रायगड सह्याद्रि
- पन्हाळा कोल्हापूर पन्हाळा डोंगर
- तोरणमाळ नंदुरबार तोरणमळा डोंगर
- चिखलदरा अमरावती गाविलगड टेकड्या
- नर्नाळा अकोला गाविलगड टेकड्या
- म्हैसमाळ औरंगाबाद वेरूळ डोंगर
सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :
विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व – पश्चिम दिशेत (वायव्य – आग्नेय)
A. सातमाळा – अजिंठा डोंगररांगा :
पूर्व – पश्चिम दिशेत
जिल्हा – नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.
उंची – 200 ते 300 मीटर
ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
पश्चिमेकडील भागास – ‘सातमाळा’
पूर्वेकडील भागास – ‘अजिंठा’ म्हणतात.
या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्यात अजिंठा लेण्या आहेत.
या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
- धुळे – गाळणा डोंगर
- नांदेड – निर्मल डोंगर
- औरंगाबाद – वेरूळ डोंगर
- हिंगोली – हिंगोली डोंगर
- नांदेड – मुदखेड डोंगर
- यवतमाळ – पुसद टेकड्या
- सातमाला – सप्तश्रुंगी(1416 मी. ), तौला – (1231 मी.), अंकाई – टंकाई – (961 मी.), सुरपालनाथ – (958 मी.),
- सतमाळा – (945 मी.)
- अजिंठा – शिरसाळा (885 मी.), बुलढाणा (546 मी.)
- पठार – मालेगाव व बुलढाणा पठार.
B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर :
आग्नेय : वायव्य दिशेत.
जिल्हा : पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर.
नाणे घाटापासून(हरिश्चंद्र – 1424) पूर्वेकडे उंची कमी होत जाते. ही डोंगररांग पुढे आग्नेयेस हैद्राबादपर्यंत जाते.
पश्चिमेकडील भागात : हरिश्चंद्र गड व पूर्वेकडील भागास – बालाघाट.
या डोंगर रांगेत पुढील डोंगररांगांचा समावेश होतो.
अहमदनगर – हरिश्चंद्र डोंगर, पुणे – तसूमाई डोंगर, अहमदनगर – बाळेश्वर डोंगर इ.
बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यात बालाघाट डोंगर पसरली आहे.
बालाघाट डोंगर रांगेत तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर व नळदुर्ग येथे नळराजांनी बांधलेला किल्ला आहे.
C. महादेव डोंगर रांगा :
वायव्य ते आग्नेय दिशेत.
महाबळेश्वर – पाचगणीपासून आग्नेयेस.
आग्नेयकडे कर्नाटककाकडे कमी होते.
या डोंगररांगेत शंभू महादेवाचे पवित्र देवालय आहे. (शिखर शिंगनापुर)
या रांगेत पुढील डोंगर आहेत. सातारा -बामणोली, कर्हाड – आगाशीव डोंगर.
या रांगेत सासवड पठार, औंध पठार, खानापूर पठाराचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर
1) कोल्हापूर-पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर
2) नंदुरबार – सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर
3) अमरावती – गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर
4) नागपूर – गरमसुर, अंबागड व मनसर टेकड्या
5) गडचिरोली – भामरागड, सुरजगड, चिरोली, चीमुर टेकड्या
6) भंडारा – दरेकसा, नवेगाव टेकड्या
7) गोंदिया – दरेकसा, नवेगाव टेकड्या
8) चंद्रपुर – चांदूरगड, पेरजागड.