सांकेतिक लिपी (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती
सांकेतिक लिपी (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती
उदा.
1. एका सांकेतिक लिपीमध्ये MUMBAI हे LVLCZJ असे लिहितात तर SOLAPUR हे कसे लिहाल?
- TPLBQVS
- MBQVSTP
- TPMBSVQS
- RPKBOVQ
वरील उदाहरणामध्ये इंग्रजी अक्षरमालिकेचा उपयोग करण्यात आला आहे. यामध्ये MUMBAI या अक्षरातील विषम स्थानचे अंक मागे चालतात तर सम स्थानचे अंक पुढे चालतात. या सुत्रानुसार SOLAPUR हा शब्द RPKBOVQ असा येईल.
2. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात, तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?
- QFODJM
- AFODJM
- QFOJMD
- ODMBHK
वरील उदाहरणामध्ये BOOK अक्षरातील प्रत्येक शब्द एक अंक मागे चालतात. या सुत्रानुसार PENCIL हा शब्द ODMBHK असा येईल.
3. EYE हा शब्द VBV असा लिहिला तर EAR हा शब्द कसा लिहाल?
- MLV
- MVH
- VZI
- NHV
वरील उदाहरणामध्ये इंग्रजी अक्षरमालिकेतील विरुद्ध शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. A=Z, B=Y, —-, M=N याप्रमाणे या सुत्रानुसार EAR करीता VZI हा शब्द येईल.
4. जर ANSWER म्हणजे REWSNA तर QUESTION म्हणजे काय?
- NOITSEUQ
- QRQTJSON
- QNUOESTI
- PDVJSTON
वरील उदाहरणामध्ये ANSWER उलट क्रमाने आला आहे. या सुत्रानुसार QUESTION हा शब्द NOITSEUQ असा येईल.
5. जर PHYSICS हा शब्द WNCWLET असा लिहिला तर GEOLOGY हा शब्द कसा लिहाल?
- YBOOGLI
- NKTPRIZ
- NKTOYGI
- YGILRIZ
वरील उदाहरणामध्ये PHYSICS या शब्दाचा WNCWLET हा सांकेतिक शब्द 7, 6, 5, 4, 3, 2, 1, या क्रमाने आले आहेत. यानुसार GEOLOGY हा शब्द NKTPRIZ असा येईल.