सांकेतिक शब्द (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

Sankrtik Shabd

सांकेतिक शब्द  (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती

उदा.

1. जर पुस्तकाला पेन म्हटले, पेनस खडू म्हटले, खडूस वही म्हटले, फळ्यावर लिहिण्याकरीता काय वापरतात?

  • पुस्तक
  • पेन
  • खडू
  • वही
स्पष्टीकरण:
वरील उदाहरणामध्येखडुला वही म्हटले आहे आणि फळ्यावर लिहिण्याकरीता खडू वापरतात. यामुळे उत्तर (वही) येईल.

2. एका सांकेतिक भाषेत कावळ्यास बगळा, बगळ्यास पोपट, पोपटास कबुतर व कबुतरास मोर म्हटले तर शांततेचे प्रतीक काय?

  • कबुतर
  • मोर
  • बगळा
  • कावळा
स्पष्टीकरण:
शांततेचे प्रतीक म्हणून कबुतर ओळखले जाते. वरील उदाहरणामध्ये कबुतराला मोर म्हटले आहे यामुळे उत्तर (मोर) येईल.

3. एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल?

  • वही
  • पेन
  • घड्याळ
  • सायकल
स्पष्टीकरण:
आपण वेळ बघण्याकरिता घड्याळ वापरतो. वरील उदाहरणामध्ये घड्याळला सायकल म्हटले आहे. यामुळे उत्तर (सायकल) येईल.

4. एका सांकेतिक भाषेत हवा म्हणजे पाणी, पाणी म्हणजे ढग, ढग म्हणजे आकाश, आकाश म्हणजे वारा तर पाऊस कशातून पडतो.

  • ढगातून
  • हवेतून
  • आकाशातून
  • वार्‍यामधून
स्पष्टीकरण:
पाऊस ढगातून पडतो वरील उदाहरणामध्ये ढगाला आकाश म्हटले आहे. यामुळे उत्तर (आकाशातून) येईल.

5. जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबधीत आहे?

  • बॅडमिंटन
  • क्रिकेट
  • टेनिस
  • यापैकी नाही
स्पष्टीकरण:
स्टेफी ग्राफ टेनिस खेळत असे. वरील उदाहरणामध्ये टेनिस या खेळाला कोणतेच नाव देण्यात आलेले नाही. यामुळे उत्तर (यापैकी नाही) येईल.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.