सार्जत योजना
सार्जत योजना 1944 :
होमरूल लीग आणि महाराष्ट्र :
- नेतृत्व – टिळक
- 1916 च्या बेळगाव बैठकीत होमरूल लीगच्या स्थापनेची घोषणा.
- टिळकांच्या होमरूल लीगचे प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि.ल.करंदीकर
- टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून होमरूल चळवळीचा प्रसार केला.
- 1917 चे होमरूल लीग अधिवेशन – नाशिक
- 1917 पर्यंत टिळकांच्या होमरूल लीगचे 33,000 सदस्य होते.
- मद्रासचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुब्रंहयणमन अय्यर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना 1917 मध्ये पत्र पाठवून भारताच्या होमरूल चळवळीस सहाय्य करण्याची विनंती केली होती.
- टिळकांनी होमरूलच्या प्रचारासाठी 1917 मध्ये जोसेफ बॅप्टिस्ता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंग्लंडला पाठविले.
- फ्रान्सचे पंतप्रधान कलेमेन्शो यांनाही टिळकांनी पत्र पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.
- टिळकांच्या होमरूल चळवळीत 44% ब्राह्मण तर 55% ब्राम्ह्णेतर होते.
असहकार आणि महाराष्ट्र :
- 1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता दिली.
- या अधिवेशनात कॉँग्रेस संघटनेच्या विस्ताराला बाल देण्यात आले.
- यावर्षी तत्वावर आधारित या प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या.
- असहकार चळवळ
- महाराष्ट्रात मद्यपनविरोधी चळवळ
- Ex – बॅरिस्टर जयकर – 1 वर्ष बहिष्कार घातला न्यायालयांवर.
- 1920 – लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय – पुणे स्थापना.
- साधकाश्रम कडून केशवराव देशपांडे अंधेरी, मुंबई
- ‘मी सहकारी नोकरी करणार नाही‘ ही शपथ साधकाश्रमात प्रवेश करणार्यास घ्यावी लागे.
- शेती करण्याचे, सुतकताईचे, दुग्धशाळा चालवण्याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण.
- मुळशी सत्याग्रह – 1921
- टाटा कंपनी विरुद्ध
- नेतृत्व – बापट, पहिले सत्याग्रही – शंकरराव देव
- सुरवातीला अहिंसक नंतर हिंसक वळण
- कालावधी 1921-24
- 1923 – बापटांना 7 वर्ष शिक्षा – ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्याबद्दल.
- टिळक स्वराज्य फंड – 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रूपयांचा स्वराज्य फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना कॉँग्रेसचे सभासद करून घ्यावे असा संकल्प.
- याच चळवळीच्या काळात गांधींनी अर्ध कपड्यांचा त्याग केला.
सविनय कायदेभंग आणि महाराष्ट्र :
- दांडी यात्रेत 13 महाराष्ट्र / 79 पैकी
- पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे, अवंतीकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना.बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणे
- 7 एप्रिल 1930 – सोलापूर सत्याग्रह
- 12 जानेवारी 1931 – जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, जयकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांना फाशी – येरवडा कारागृहात, पुणे.
- शिरोडा सत्याग्रह – 12 मे 1930 – मीठ
- वडाळा सत्याग्रह – 17 मे 1930 – मीठ
- बिळाशी सत्याग्रह – 5 सप्टेंबर 1930 – जंगल- सत्याग्रह
- उंबरगाव – 5 मे 1930 – मीठ – नानासाहेब देवधर, कमलादेवी चट्टोपाध्याय
- चिरणेर सत्याग्रह – पनवेल – ठाणे – मीठ
- बाबू गेनू – 12 दि. 1930 – मुंबई – वळवादेवी नवीन हनुमान रस्ता येथे बलिदान दिले.
- दहीहंडी सत्याग्रह – अकोला – खार्या पाण्याच्या विहिरीतून मीठ तयार करून सत्याग्रह केला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे.
- यवतमाळ – बापुजी अणे
- नागपुर – नरकेसरी अभ्यंकर
- पुसद – 10 जुलै 1930 – जंगल – सत्याग्रह – बापुजी अणे – 6 महीने शिक्षा
- शिरोडा सत्याग्रह – आठल्ये, श.द.जावडेकर, विनायकराव मुस्कूटे
- याच काळात मुंबईचे हंगामी गव्हर्नर हॉटसन यांच्यावर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील वासुदेव बळवंत गोगटे या तरुणाने गोळ्या झाडल्या. गोगटेला 8 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
1942 – भारत छोडो
- मुंबई – सेंट्रल डायरेक्टरेट – भूमिगतांची मध्यवर्ती संस्था – क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा.
- भूमिगत चळवळ – अरुण असफअली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, सानेगुरूजी, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे
- मुंबई रेडिओ स्टेशन – उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी
- भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील – रायगड परिसरात – सशक्त क्रांतिकारकांची सेना – टाटा पावर केंद्रातून मुंबईला होणारा वीजपुरवठा खंडीत केला.
- आझाद दल – नागनाथअण्णा नायकवडी
प्रतिसरकार – क्रांतिसिंह नाना पाटील
- सत्यशोधक चळवळीचा नानांवर प्रभाव होता.
- वाय.बी. चव्हाण, जी.डी.देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर
- 1943-46 पर्यंत कार्यरत
- प्रभात फेर्या, मोर्चे, टेलिफोनच्या तारा तोडणे,रेल्वे रूळ उखडणे, सधन लोकांच्या घरावर दरोडा टाकून पैसा उभारणे.
- पुणे – वेस्टएंड आणि कॅपिटल थिएटरला स्फोट बॉम्ब
खानदेश :
- साने गुरुजी आणि मधु लिमये मार्गदर्शक
- नेतृत्व – उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील
- चिमठाने खनिजा लुटला – लीलाताई आणि जी.डी.लाड आणि नायकवडी नागनाथ अण्णा
- शिरिषकुमार मेहता – बलिदान – नंदुरबार
- अब्दुल रंजवा – भुसावळ – रेल्वे उलथवल्या
विदर्भ :
- हिंदुस्थान लाल सेना – मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर, श्याम नारायण काश्मिरी
- HSRA च प्रभाव श्याम नारायण काश्मिरी यांच्यावर होता.
- तुकडोजी महाराजांचे अभंगातून प्रबोधन
- सावली संग्राम (अमरावती) – जिल्हाधिकारी मेल्ड्रमवर हल्ला – सैन्यदलाचा वापर ब्रिटीशांनी केला.
- बेनोडा सत्याग्रह – नेतृत्व – वामनराव पाटील आणि चिमुर – चंद्रपुर
प्रतिसरकार (सातारा) :
- विजयाताई लाडा, रजुताई कदम, लक्ष्मीबाई नायकवडी, लीलाताई पाटील इ. स्त्रियाही सहभागी होत्या
- सामाजिक सुधारणा – दारूबंदी, गांधीविवाह
- न्यायदान व्यवस्था – स्वस्तात न्याय मिळवून देणे हा उद्देश
मुंबई-नौसैनिकांचा उठाव – तलवार
- अन्न, राहण्याची व्यवस्था इ. बाबतीत दुर्व्यवस्था
- खालच्या दर्जाची वागणूक – शिवीगाळ
- वेतन कमी