सर्व शिक्षण मोहीम (प्राथमिक शिक्षण) – 2002
सर्व शिक्षण मोहीम (प्राथमिक शिक्षण) – 2002
Must Read (नक्की वाचा):
महाराष्ट्र शासनाच्या तिसर्या महिला धोरणाविषयी संपूर्ण माहिती
- केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना हाती घेतली असून या योजनेचे ब्रीदवाक्य ‘सारे शिकूया पुढे जाऊया’ असे आहे.
- या योजनेची काही महत्वाची उद्दीष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
- सर्व मुला मुलींना शाळा, शिक्षण हमी केंद्र पर्यायी शिक्षण केंद्र इ. मध्ये दाखल करणे.
- इ.स. 2007 पर्यंत सर्व मुला-मुलींचे 5 वर्षाच्या आत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे.
- इ.स. 2010 पर्यंत सर्व मुला-मुलींचे आठ वर्षाचे शालेय शिक्षण पूर्ण करणे.
- प्राथमिक शिक्षणाचा समाधानकारक दर्जा व जीवनोपयोगी शिक्षणावर भर देणे.
- इ.स. 2007 पर्यंत प्राथमिक स्तरावरील लिंग भेद व सामाजिक क्षेत्रातील फरक दूर करणे व उच्च प्राथमिक शिक्षणाबाबत हेच उद्दिष्ट 2010 पर्यंत साध्य करणे.
- इ.स. 2010 पर्यंत 100% उपस्थितीचे उद्दिष्ट साध्य करणे.