शब्दांच्या शक्ती व त्याचे प्रकार
शब्दांच्या शक्ती :
शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते.
- अभिधा
- लक्षणा
- व्यंजन
Must Read (नक्की वाचा):
एखादा शब्द उच्चारल्यावर त्याच्याशी निगडीत जो सर्वसामान्य अर्थ निघतो, त्या शब्दांच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात.
उदा.
- मी एक वाघ पहिला.
- आमच्याकडे एक कासव आहे.
ज्यावेळी आपण शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतो त्यावेळी शब्दांच्या शक्तीस लक्षणा असे म्हणतात.
उदा.
- आम्ही बाजरी खातो.
- घरावरून उंट गेला.
- सूर्य बुडाला.
ज्यावेळी शब्दांच्या मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करतो तेव्हा शब्दांच्या शक्तीस व्यंजन असे म्हणतात.
उदा.
- भुंकणारे कुत्रे चावत नाही.
- समाजात भरपूर लांडगे पहावयास मिळतात.
- समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे.