शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 2 बद्दल माहिती
शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 2 बद्दल माहिती
- पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ – अंग्यारी
- हातशिलाई करताना सुईटोचू नये म्हणून बोटात घालावयाचे धातूचे टोपण – अंगुस्तान
- ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य
- सन्मानाने प्रथम केलेली पूजा – अग्रपूजा
- तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला – अतिथी
- विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कलेले गैरकृत्य – अतिक्रमण
- ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
- खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
- अवकाशात प्रवास करणारा – अंतराळवीर
- ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग
- ज्याचा सारखा दूसरा कोणीही नाही असा – अव्दितीय, अजोड
- ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – अजानबाहू