शक्ती बद्दल संपूर्ण माहिती
शक्ती बद्दल संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे ‘शक्ती’ होय.
- कार्य करण्याच्या दरास ‘शक्ती’ म्हणतात.
- केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.
- गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.
- शक्ती (P) = कार्य/काल = w/t
शक्तीचे एकक :
- SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
- 1 वॅट = 1 ज्युल/सेकंद
- 1 किलोवॅट = 1000 वॅट
- औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
- 1 अश्वशक्ती = 746 वॅट
- व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.
- 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
- 1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w × 3600 s
= 3.6 × 106 Joules
- घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.