SRPF Police Bharti Question Set 12
SRPF Police Bharti Question Set 12
1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?
- मांजर
- मानव
- कोल्हा
- गाय
उत्तर : गाय
2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?
- स्वातंत्र्य दिन
- युवा दिन
- प्रजासत्ताक दिन
- बालिका दिन
उत्तर :प्रजासत्ताक दिन
3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?
- 40
- 60
- 35
- 49
उत्तर :35
4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा- सोने
- हेम
- केसरी
- रम्य
- तर
उत्तर :हेम
5. ‘वाढदिवस’ या शब्दातील ‘वा’ या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
- एक
- दोन
- तीन
- चार
उत्तर :चार
6. ‘काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
- तुम्हीही
- काका
- बसा
- आमच्याजवळ
उत्तर :बसा
7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
- पोलीस
- धूसर
- मुकुट
- टिळा
उत्तर :टिळा
8. ‘अष्टपैलू’ – या शब्दाचा अर्थ.
- आठ कलेत पारंगत
- एका कलेत पारंगत
- पैलू पाडणारा
- सर्व कलांत पारंगत
उत्तर :सर्व कलांत पारंगत
9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.
- पाऊल
- पिल्लू
- घोडा
- गाढव
उत्तर :घोडा
10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
- पिता
- भ्राता
- देवता
- नेता
उत्तर :देवता
11. ‘जनक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
- जानकी
- जननी
- जनका
- जनकी
उत्तर :जननी
12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.
- गळा
- शाळा
- मळा
- विळा
उत्तर :शाळा
13. एकवचनी असलेला शब्द शोधा.
- तळे
- मळे
- डोळे
- गोळे
उत्तर :तळे
14. ‘उंदराला —– साक्ष’ ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.
- मांजर
- कुत्रा
- पोपट
- कावळा
उत्तर :मांजर
15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ
- प्रगती होणे
- पूर्णपणे नष्ट होणे
- जमीन हादरणे
- मैत्री वाढणे
उत्तर :पूर्णपणे नष्ट होणे
16. ‘मित्र’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- मैत्री
- शत्रू
- मैत्रीण
- सूर्य
उत्तर :शत्रू
17. ‘बिनभाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ.
- शाळा
- घराला भाडे नसणे
- तुरुंग
- मंदिर
उत्तर :तुरुंग
18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.
- तबेला
- पागा
- गोठा
- घोडागृह
उत्तर :पागा
19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.
- मदारी
- जादूगार
- दरवेशी
- गारुडी
उत्तर :गारुडी
20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी
- अमृत
- दूध
- झरा
- सलील
उत्तर : सलील