स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षेविषयी संपूर्ण माहिती
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) परीक्षेविषयी संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
- कम्बाइंन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा
- हायर सेकंड्री (10+2) लेव्हल परीक्षा
कम्बाइंन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा केंद्र सरकारशी संबंधित विविध विभागामध्ये तसेच मंत्रालयामध्ये वर्ग 2 व वर्ग 3 च्या अधिकार्यांची निवड या परीक्षेतून केली जाते.
भरली जाणारी पदे :
ग्रुप-अ
- असिस्टंट इन्स्पेक्टर (पोस्ट)
- इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज
- प्रीव्हेंटिव्ह ऑफिसर / एक्झामिनर
- सब इन्स्पेक्टर (सीबीआय)
- इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स
- असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर
- डिव्हीजनल अकाउंटंत
- स्टॅटिस्टिकल इनव्हेस्टिगेटर
ग्रुप – ब
- ऑडिटर्स
- ज्युनिअर अकाउंटंट / अकाउंटंट (कॅग मध्ये)
- अप्पर डिव्हिजनल क्लर्क
- टॅक्स असिस्टंट
- कम्पायलर (संकलक)
पात्रता : उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे मात्र काही पदांसाठी ठराविक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते.
कम्पायलर (संकलक) : अर्थशास्त्र, संख्याशास्त्र किंवा गणितातले पदवीधर असणे आवश्यक आहे.
स्टॅटिस्टिकल इनव्हेस्टिगेटर : संख्याशास्त्रातील पदवीधर किंवा कॉमर्स, गणित, अर्थशास्त्र शाखांमधले पदवीधर (पदवीला किमान एखाद्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये संख्याशास्त्र हा विषय घेतलेला असला पाहिजे)
परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुर, अमरावती व नागपुर
प्रवेश अर्ज : प्रवेश अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन (पोस्टाव्दारे) भरता येतात.
परीक्षेचे स्वरूप :
परीक्षा तीन टप्प्यात होते.
पहिला टप्पा :
सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा समान असते. पूर्वपरीक्षेसाठी एक पेपर 200 प्रश्नांचा 200 गुणांचा असतो, त्यात चार विभाग असतात.
- जनरल अवेअरनेस
- जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग
- क्वाटीटेटिव्ह अॅप्टिट्युड
- इंग्रजी
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. प्रत्येकी विभागावर 50 प्रश्न विचारले जातात, वेळ 2 तास असतो. प्रश्न इंग्रजी आणि हिंदी भाषांत असतात.
दुसरा टप्पा :
ही परीक्षा पहिला टप्पा पार करणार्यांसाठी असते, सर्व पदांसाठी खालील दोन पेपर होतात.
पेपर-1
क्वाटीटेटिव्ह अॅबिलिटी – 200 गुण, (100 प्रश्न), वेळ 2 तास
पेपर-2
इंग्रजी भाषा व कॉम्प्रिहेशन – 200 गुण, (200 प्रश्न), वेळ 2 तास
प्रश्नपत्रिकेच स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते.
कम्पायलर (संकलक) व स्टॅटिस्टिकल इनव्हेस्टिगेटर (वर्ग 2) या पदांसाठी अजुन एक 200 गुणांचा संख्याशास्त्राचा पेपर असतो.
तिसरा टप्पा : मुलाखत
तिसरा टप्पा म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी. ऑडिटर्स, ज्युनिअर अकाउंटट / अकाउंटट अप्पर डिव्हिजनल क्लर्क, टॅक्स असिस्टंट, कम्पायलर (संकलक) या पदांसाठी मुलाखत घेतली जात नाही. उर्वरित सर्व पदांसाठी 100 गुणांची मुलाखत घेतली जाते.
स्किल टेस्ट (कौशल्यचाचणी) :
सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिसमधील असिस्टंट पदासाठी संगणक कौशल्य चाचणी घेण्यात येते. टॅक्सी असिस्टंट पदासाठी कम्प्युटर डेटा एन्ट्री स्पीड परीक्षा घेण्यात येते, तशी 8000 की डिप्रेशन वेग आवश्यक असतो. अथवा कौशल्य चाचणी घेण्यात येत नाही.
शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी :
खालील पदांसाठी शारीरिक पात्रता व क्षमता चाचणी घेतली जाते.
- इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साइज / प्रिव्हेटिव्ह ऑफिसर / एक्झामिनर)
- सब इन्स्पेक्टर (सीबीआय) – शारीरिक पात्रता
केंद्र सरकारच्या अनेक विभागात (इनकम टॅक्स, एक्साईज व सेल्स टॅक्स इ.) व मंत्रालयात डेटा एंट्री ऑपरेटर व लोअर डिव्हिजल क्लर्क (LDC) ची भरती या परीक्षेद्वारा केली जाते.
या परीक्षेत दोन टप्पे असतात. लेखी परीक्षा व स्किल टेस्ट
परीक्षेच्या पात्रता : विद्यार्थी 12 वी पास असावा
वय : 18 ते 27 वर्ष, राखीव गटासाठी वयात शिथिलता असते.
परीक्षेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते, प्रश्न इंग्रजी व हिंदी या दोन भाषेत दिलेली असतात.
प्रश्नपत्रिकेत एकूण चार भाग असतात, बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा, गणित व जनरल अवेरनेस.
प्रत्येकी 50 गुण या प्रमाणे 200 गुण असतात. वेळ 2 तास. एक चुकीचा उत्तरासाठी 0.25 गुण कापले जातात.
स्किल टेस्ट :
डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी ताशी 8000 किज (न्युमेरिक डेटा) ची संगणकावर टेस्ट घेतली जाते.
लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदांच्या यशस्वी उमेदवारांची टायपिंग टेस्ट घेण्यात येते. इंग्रजीसाठी 35 शब्द प्रती मिनिट व हिंदीसाठी 30 शब्द प्रती मिनिट.
send mi link