STI Pre Exam Question Set 18

STI Pre Exam Question Set 18

1. हिर्‍याचा अपवर्तनांक किती?

  1.  1.5
  2.  1.6
  3.  2.42
  4.  1.33

उत्तर : 2.42


2. शुष्क बर्फ म्हणजे —– होय.

  1.  घनरूप CO२
  2.  घनरूप CO
  3.  द्रवरूप CO२
  4.  वायुरूप CO२

उत्तर : घनरूप CO२


3. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या —— आहे.

  1.  250
  2.  266
  3.  288
  4.  278

उत्तर : 288


4. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.

  1.  4
  2.  48
  3.  720
  4.  20

उत्तर : 48


5. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात —— क्रमांक होता.

  1.  4
  2.  7
  3.  2
  4.  5

उत्तर : 4


6. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1.  मुल्क राज आनंद
  2.  शोभा डे
  3.  अरुंधती राय
  4.  खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


7. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

  1.  सिंधुदुर्ग
  2.  ठाणे
  3.  रत्नागिरी
  4.  रायगड

उत्तर : ठाणे


8. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

  1.  मुंबई
  2.  बंगलोर
  3.  कानपूर
  4.  हैदराबाद

उत्तर : बंगलोर


9. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

  1.  20 मीटर
  2.  200 मीटर
  3.  180 मीटर
  4.  360 मीटर

उत्तर : 200 मीटर


10. मुंबई उच्च न्यायालयाची —– खंडपीठे आहेत.

  1.  दोन
  2.  तीन
  3.  चार
  4.  एक

उत्तर : तीन


11. राज्याचा आकस्मिक निधी —— च्या अखत्यारीत असतो.

  1.  राज्यपाल
  2.  मुख्यमंत्री
  3.  मंत्रीपरिषद
  4.  राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल


12. सन —— मध्ये ज्योतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ या संस्थेची स्थापना केली.

  1.  1875
  2.  1873
  3.  1870
  4.  1851

उत्तर : 1873


13. खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात?

  1.  केळी
  2.  आंबा
  3.  मका
  4.  चिंच

उत्तर : मका


14. गोदावरी नदी महाराष्ट्रात —– येथून उगम पावते.

  1.  भीमाशंकर
  2.  मुलताई
  3.  त्रिंबकेश्वर
  4.  महाबळेश्वर

उत्तर : त्रिंबकेश्वर


15. जैव तंत्रज्ञान —– पातळीवर कार्य करते.

  1.  रेणु
  2.  अणू
  3.  द्रव
  4.  पदार्थ

उत्तर : रेणु


16. तैवानचे जुने नाव काय होते?

  1.  सैगाव
  2.  फॉर्मोसा
  3.  तैपी
  4.  चिली

उत्तर : फॉर्मोसा


17. ‘शेतकर्‍याचा आसूड’ हे पुस्तक कोणी लिहिले?

  1.  डॉ. आंबेडकर
  2.  डॉ. पंजाबराव देशमुख
  3.  पंडिता रमाबाई
  4.  महात्मा फुले

उत्तर : महात्मा फुले


18. भारतातील सर्वात मोठा बहूद्देशीय प्रकल्प कोणता?

  1.  भाक्रा नानगल
  2.  दामोदर
  3.  जायकवाडी
  4.  तुंगभद्रा

उत्तर : दामोदर


19. 1 मिलीमीटर = —— मायक्रोमीटर

  1.  10   
  2.  100
  3.  1000
  4.  10,000

उत्तर : 1000


20. ‘भारतीय प्रमाणक संस्था’ —– शहरात आहे.

  1.  मुंबई
  2.  चेन्नई
  3.  कलकत्ता
  4.  नवी दिल्ली  

उत्तर : नवी दिल्ली 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.