STI Pre Exam Question Set 3
STI Pre Exam Question Set 3
1. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.
- 100, 525
- 125, 450
- 100, 500
- 125, 500
उत्तर : 125, 500
2. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.
- 750
- 7500
- 7700
- 770
उत्तर : 7500
3. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.
- 13 सेंमी
- 7 सेंमी
- 10 सेंमी
- 8 सेंमी
उत्तर : 10 सेंमी
4. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?
5,8,11,14, —–.
- 21
- 23
- 24
- 22
उत्तर : 21
5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?
- 4
- 3
- 5
- 8
उत्तर : 4
6. 4,10,12,24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणार्या संख्या प्रमाणात येतील?
- 5
- 2
- 3
- 4
उत्तर : 4
7. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?
- 1776
- 1876
- 1666
- 1676
उत्तर : 1776
8. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या?
- 24
- 22
- 18
- 28
उत्तर : 18
9. कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, जर एकूण मुले 484 असतील, तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?
- 24
- 22
- 18
- 28
उत्तर : 22
10. एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?
- 34
- 62
- 43
- 26
उत्तर : 26
11. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला, तर त्या गोलाची त्रिज्या किती?
- 7 सेंमी
- 7 सेंमी
- 8 सेंमी
- 9 सेंमी
उत्तर : 7 सेंमी
12. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
- 1500
- 2000
- 3000
- 2500
उत्तर : 3000
13. जर 60 वॉटच विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभावांतर असलेल्या स्त्रोतास जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
- 27.27 A
- 2.727 A
- 272.7 A
- 0.2727 A
उत्तर : 0.2727 A
14. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
- अष्टकाचे तत्व
- मूलद्र्व्यांचे अणूअंक
- मूलद्रव्यांचे अणूवस्तुमान
- मूलद्र्व्यांचे त्रिकांचे अस्तित्व
उत्तर : मूलद्र्व्यांचे अणूअंक
15. वांरवारतेचे S.I. एकक काय आहे?
- न्यूटन
- वॉट
- हर्टत्झ
- ज्युल
उत्तर : हर्टत्झ
16. लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.
- मंदगती
- जलदगती
- उष्माग्राही
- जलदगती व उष्माग्राही
उत्तर : मंदगती
17. —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.
- गनोर्हिर्या
- चिकूनगुनिया
- सिफीलिस
- कॅक्राईड
उत्तर : चिकूनगुनिया
18. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
- बहुवार्षिक
- वार्षिक
- व्दिवार्षिक
- रोपटे
उत्तर : व्दिवार्षिक
19. ‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
- जगदीश चंद्र बोस
- कॅमिलो गॉल्गी
- रॉबर्ट हुक
- रॉबर्ट ब्राऊन
उत्तर : रॉबर्ट हुक
20. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात?
- दृढ
- पृष्ठभागीय
- स्थूलकोन
- हरित
उत्तर : दृढ