STI Pre Exam Question Set 32
STI Pre Exam Question Set 32
1. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?
- सिमेंट उद्योग
- चर्मोद्योग
- काच उद्योग
- रबर माल उद्योग
उत्तर : रबर माल उद्योग
2. भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?
- गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर
- गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय
- गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम
- गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड
उत्तर : गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम
3. ‘गरीबी हटाओ’ घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
- तिसरी पंचवार्षिक योजना
- पाचवी पंचवार्षिक योजना
- सहावी पंचवार्षिक योजना
- सातवी पांचवार्षिक योजना
उत्तर : सहावी पंचवार्षिक योजना
4. 2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?
- ब्राझिल मेक्सिको, रशिया
- मेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनी
- रशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग
- साऊथ कोरिया, जपान, चीन
उत्तर : ब्राझिल मेक्सिको, रशिया
5. खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?
- स्वामिनाथन समिती
- चेलय्या समिती
- नरसिंहम समिती
- केळकर समिती
उत्तर : नरसिंहम समिती
6. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
- डोकेदुखी
- हगवण
- डायरिया
- निद्रानाश
उत्तर : डोकेदुखी
7. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?
- GZTZLMH
- GZHTZIM
- GZHTAZM
- GZHLMZT
उत्तर : GZHTZIM
8. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?
- W<Y<X<Z
- Y<W<X<Z
- X<Z<Y<W
- Z<X<W<Y
उत्तर : Y<W<X<Z
9. एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा.
ak, eo, is, (?), qa, ue
- lv
- mw
- lw
- mv
उत्तर : mw
10. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
- 1500
- 2000
- 3000
- 2500
उत्तर : 3000
11. जर 60 वॉटच विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभावांतर असलेल्या स्त्रोतास जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?
- 27.27 A
- 2.727 A
- 272.7 A
- 0.2727 A
उत्तर : 0.2727 A
12. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?
- अष्टकाचे तत्व
- मूलद्र्व्यांचे अणूअंक
- मूलद्रव्यांचे अणूवस्तुमान
- मूलद्र्व्यांचे त्रिकांचे अस्तित्व
उत्तर : मूलद्र्व्यांचे अणूअंक
13. वांरवारतेचे S.I. एकक काय आहे?
- न्यूटन
- वॉट
- हर्टत्झ
- ज्युल
उत्तर : हर्टत्झ
14. लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.
- मंदगती
- जलदगती
- उष्माग्राही
- जलदगती व उष्माग्राही
उत्तर : मंदगती
15. —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.
- गनोर्हिर्या
- चिकूनगुनिया
- सिफीलिस
- कॅक्राईड
उत्तर : चिकूनगुनिया
16. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
- बहुवार्षिक
- वार्षिक
- व्दिवार्षिक
- रोपटे
उत्तर : व्दिवार्षिक
17. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
- परभणी
- लातूर
- भंडारा
- औरंगाबाद
उत्तर : औरंगाबाद
18. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
- दिल्ली
- कोलकता
- मुंबई
- चेन्नई
उत्तर : मुंबई
19. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?
- विधानसभा
- विधानपरिषद
- लोकसभा
- मंत्रीपरिषद
उत्तर : मंत्रीपरिषद
20. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?
- पाच
- तीन
- सात
- नऊ
उत्तर : तीन
Thanks .most usefull
Nice
Mahiti khup mahatvachi dileli aahe…