STI Pre Exam Question Set 4

STI Pre Exam Question Set 4

1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

  1.  97,000
  2.  9,700
  3.  10,000
  4.  21,000

उत्तर : 97,000


2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

  1.  5 km/s
  2.  18 km/s
  3.  18 m/s
  4.  5 m/s

उत्तर : 5 m/s


3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

  1.  यकृत ग्रंथी
  2.  लाळोत्पादक ग्रंथी
  3.  स्वादुपिंड
  4.  जठर

उत्तर : यकृत ग्रंथी


4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

  1.  A
  2.  B
  3.  D
  4.  C

उत्तर : D


5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

  1.  42 ओहम
  2.  576 ओहम
  3.  5760 ओहम
  4.  5.76 ओहम

उत्तर : 576 ओहम


6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

  1.  A
  2.  B
  3.  C
  4.  D

उत्तर : A


7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

  1.  मुकनायक
  2.  जनता
  3.  समता
  4.  संदेश

उत्तर : संदेश


8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

  1.  9800 J
  2.  980 J
  3.  98 J
  4.  9.8 J  

उत्तर : 980 J


9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

  1.  वि.दा. सावरकर
  2.  अनंत कान्हेरे
  3.  विनायक दामोदर चाफेकर
  4.  गणेश दामोदर चाफेकर

उत्तर : अनंत कान्हेरे


10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

  1.  गांधीजींना अटक
  2.  काँग्रेसचा विरोध
  3.  चौरी-चौरा घटना
  4.  पहिले महायुद्ध

उत्तर : चौरी-चौरा घटना


11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

  1.  अनंत कान्हेरे
  2.  खुदिराम बोस
  3.  मदनलाल धिंग्रा
  4.  दामोदर चाफेकर

उत्तर : मदनलाल धिंग्रा


12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?

  1.  135 व 50
  2.  135 व 60
  3.  145 व 50
  4.  145 व 60

उत्तर : 145 व 60


13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

  1.  अप्पासाहेब परांजपे
  2.  तात्यासाहेब केळकर
  3.  भास्करराव जाधव
  4.  धोंडो केशव कर्वे

उत्तर : धोंडो केशव कर्वे


14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

  1.  राजा राममोहन रॉय
  2.  केशव चंद्र सेन
  3.  देवेंद्रनाथ टागोर
  4.  ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर : राजा राममोहन रॉय


15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

  1.  उदारमतवादी पक्ष
  2.  स्वराज्य पक्ष
  3.  काँग्रेस पक्ष
  4.  मुस्लिम लीग

उत्तर : स्वराज्य पक्ष


16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

  1.  स्वामी दयानंद
  2.  स्वामी विवेकानंद
  3.  अॅनी बेझंट
  4.  केशवचंद्र सेन

उत्तर : अॅनी बेझंट


17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

  1.  इस्लामाबाद
  2.  ढाका
  3.  अलाहाबाद
  4.  अलिगड

उत्तर : ढाका


18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

  1.  1895
  2.  1896
  3.  1897
  4.  1898

उत्तर : 1897


19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

  1.  डॉ. बी.आर. आंबेडकर
  2.  वि.रा. शिंदे
  3.  महात्मा जोतिबा फुले
  4.  भास्करराव जाधव

उत्तर : वि.रा. शिंदे


20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

  1.  1915
  2.  1916
  3.  1917
  4.  1918

उत्तर : 1916

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.