क्रियावाचक नाम व त्याचे उपयोग
Must Read (नक्की वाचा):
- खालील वाक्य वाचा –
- Reading is his favourite pastime.
- इथे read क्रियेला ing लावून Reading शब्द बनला आहे.
- या ठिकाणी याचा उपयोग क्रियेच्या कर्त्याप्रमाणे झाला असल्यामुळे तो नामाचे कार्य करतो. म्हणून हे क्रियावाचक नाम (GERUND) आहे. त्याची आणखी उदाहरणे पाहू या –
- Playing cards is not allowed here.
- I like reading poetry.
- He is fond of hoarding money.
- पहिल्या वाक्यात क्रियावाचक नाम क्रियेचा कर्ता आहे, पण त्याचसोबत कर्मसुद्धा आहे. म्हणून क्रियेचे कामही करतो.
- दुसर्या वाक्यातही नामाप्रमाणेच क्रियावाचक नाम क्रियेचे कर्म आहे.
- तिसर्या वाक्यात नामाप्रमाणे क्रियावाचक नाम अव्ययासोबत आहे पण तरीही क्रियेप्रमाणे याचेही कर्म आहे.
- असे दिसते की, क्रियार्थक नाम (Infinitive) आणि क्रियावाचक नाम (Gerund) दोन्ही नामाप्रमाणे वापरल्यास सारखेच असते.
- परिभाषा – क्रियावाचक नाम (Gerund) क्रियेचे असे रूप आहे. ज्याच्या शेवटी-ing असते. जे नाम आणि क्रिया असे दोन्हीचे काम करते.
- क्रियावाचक नाम आणि क्रियार्थक नाम दोन्ही नाम आणि क्रियेचे काम करतात. म्हणून दोघांचा प्रयोग सारखाच होतो.
जसे –
- Teach me to swim.
- To see is to believe.
- Teach me swimming.
- Seeing is believing
- To give is better than to receive.
- Giving is better than receiving.
- खालील वाक्य संयुक्त क्रियावाचक नामाची (Compound Gerund)
उदाहरणे –
- I heard of his having gained a prize.
- We were fatigued o account of having walked so far.
- They were charged with having sheltered anarchists.
- He is desirous of being praised.
- असे दिसते की, have आणि be च्या रुपानंतर भूतकालिक धातुसाधिते (Past Participle) वापरुन बनविले जाते.
- सकर्मक क्रियेच्या क्रियावाचक नामाची खालील रुपे आहेत.
Active Passive
Present: loving Present: being loved
Perfect: having loved Perfect: having been loved
- क्रियावाचक नाम आणि वर्तमानकाळ वाचक धातुसाधिते दोघांच्या शेवटी ing येते. म्हणून लक्षपूर्वक दोघांमधील भेद लक्षात घ्यावयास हवा.
क्रियावाचक नाम (Gerund) नाम आणि क्रिया दोघांचे काम करते. हे Verbal Noun आहे.
- वर्तमानकाळ वाचक धातुसाधिते (Persent Participle) विशेषण आणि क्रियेचे कार्य करते. हे Verble Adjective आहे.
- He is fond of playing cricket.
- The old man was tired of walking.
- We were prevented from seeing the prisoner.
- Seeing, he believed.
धातुसाधित उदाहरणे –
- Playing cricket, he gained health.
- Walking along the road, he noticed a dead cobra.
- Seeing, he believed.
- खालील वाक्य वाचा –
- The indiscriminate reading of novels is injurious.
- इथे Reading चा उपयोग साधारण नामाप्रमाणे झाला आहे.
- यात आधी the चा आणि नंतर of चा प्रयोग केलेला आहे.
- साधारण नामाप्रमाणे प्रयुक्त क्रियावाचक नामाची आणखी उदाहरणे –
- The making of the plan is in hand.
- The time of the singing of the birds has come.
- Adam consented to the eating of the fruit.
- The middle station of life seems to be the most advantageously situated for the gaining of wisdom.
- खालील प्रकाराच्या संयुक्त नामात –
- walking-stick
- frying-pan
- hunting-wnip,
- fencing-stick,
- writing-table.
- walking, frying, hunting, fencing, writing क्रियावाचक नाम (Gerunds) आहेत.
- याचा अर्थ आहे ‘a stick of walking’, ‘a pan for frying’, ‘a whip for hunting’, ‘a stick for fencing’, आणि ‘a table for writing.’
- खालील दोन वाक्यांची तुलना करा –
- I hope you will excuse my leaving early.
- I hope you will excuse me leaving early.
- पहिल्या वाक्यात क्रियावाचक नामा आधीचा शब्द संबंधसूचक आहे. आणि दुसर्या वाक्यात कर्मकारक आहे. दोन्ही वाक्ये शुद्ध आहेत.
- दोन्ही प्रकारे प्रयोग करू शकतो. संबंधसूचक जास्त औपचारिक आहे. रोजच्या वापरात त्याचा कमी उपयोग होतो.
- पुढे दुसरी काही उदाहरणे दिलेली आहेत.
- We rejoiced at his/him being promoted.
- I insist on you-/youbeing present.
- Do you mind my/me sitting here?
- All depends of Karim’s/Karim passing the exam.
- I disliked the manager’s/mavager asking me personal questions.
- The accident was due to the engine-driver’s/engine-driver disregarding the singnals.
क्रियावाचक नामाचा उपयोग (USE OF THE GERUND) :
- Verb-noun असल्यामुळे याचा उपयोग खालीलप्रमाणे होऊ शकतो.
1. क्रियेचा कर्ता;
उदा.
- Seeing is believing.
- Hunting deer is not allowed in this country.
2. सकर्मक क्रियेचे कर्म,
उदा.
- Stop playing.
- Children love making mud castles.
- I like reading poetry.
- He contemplated marrying his cousin.
3. संबंध सुचकाचे (Preposition) कर्म,
उदा.
- I am tired of waiting.
- He is fond of swimming.
- He ws punished for telling a lie.
- We were prevented from seeing the prisoner.
- I have an aversion to fishing.
4. क्रियेचे पूरक (Complement),
उदा.
- Seeing is believing.
- What I most detest is smoking.
5. निरपेक्ष (absolutely),
उदा.
- Plyaing cards being his aversion, we did not play bridge.