न्यू अकॅडमी प्राईज 2018 (संपूर्ण माहिती)
न्यू अकॅडमी प्राईज 2018 (संपूर्ण माहिती)
- ग्वाडेलोपीयन लेखिका मॅरिसे कॉन्डे यांना सन 2018 चा साहित्यातील न्यू अॅकॅडमी प्राईज (The New Academy Prize in Literature) जाहीर झाला असून, 9 डिसेंबर 2018 रोजी त्याचे वितरण. हा पुरस्कार साहित्यक्षेत्रातील नोबेलच्या बदल्यात देण्यात आले.
मॅरिसे कॉन्डे यांच्याविषयी माहिती –
- जन्म: 1937, Pointe-a-Pitre, ग्वाडेलोप.
- वयाच्या 16व्या वर्षीच पॅरिसला स्थायिक.
- Sorbonne यूनिवर्सिटीतून शिक्षण.
- सन 2002 पर्यंत न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात कोलंबियन साहित्याचे अध्यापन.
- त्यांनी लेखन केलेल्या कादंबरी: ‘Segou’, ‘Travergee de la Mangrove’, ‘Desicada’, ‘En attendant la montee des eaus’, ‘La Vie Sans Fards’.
1. स्वीडनमधील सांस्कृतिक घडामोडीमध्ये सक्रिय सहभाग असणारे ज्याँ-क्लाऊड अर्नोल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे व आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले असंल्याने यावर्षी (सन 2018) साहित्याचे नोबेल दिले गेल नाही.
2. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार देण्यासाठी The New Academy ची स्थापना करण्यात आली, जी डिसेंबर 2018 मध्ये विसर्जित.