क्रियापद व त्याचे प्रकार
सकर्मक आणि अकर्मक क्रियापदे (Transitive and Intransitive Verbs):
Must Read (नक्की वाचा):
- क्रियापद (verb) म्हणजे असा शब्द जो एखाधा व्यक्ती किंवा वस्तुविषयी काही सांगतो किंवा निश्चयपूर्वक विधान करतो.
- Verb हा शब्द लॅटीन verbum (म्हणजे एक शब्द) या शब्दापासून तयार झाला आहे. हा शब्द वाक्यातील सर्वात महत्वाचा शब्द असल्यापुढे त्याला ‘Verb’ (शब्द) असे नाव देण्यात आले आहे.
- क्रियापद आपल्याला खालील गोष्टी सांगू शकते –
i. एखादी वस्तू किंवा व्यक्ती काय क्रिया करते.
उदा.
- Hari laughs.
- The clock strikes
ii. एखाधा वस्तू किंवा व्यक्तीवर काय क्रिया घडली.
उदा.
- Hari is scolded.
- The window is broken.
iii. एखादी वस्तू किंवा व्यक्ती काय आहे.
उदा.
- The cat is dead.
- Glass is brittle.
- I feel sorry.
व्याख्या :
- एखाधा वस्तू किंवा व्यक्ती विषयी काही सांगण्यासाठी किंवा निश्चयपूर्वक विधान करण्यासाठी वापरण्यात येणार्या शब्दाला क्रियापद (verb) असे म्हणतात.
- एक क्रियापदात बर्याचदा एकापेक्षा अधिक शब्दांचा समावेश होतो.
उदा.
- The girls were singing.
- I have learnt my lesson.
- The watch has been found.
- खालील वाक्ये वाचा –
1. The boy kicks the football.
2. The boy laughs loudly.
- पहिल्या वाक्यामध्ये, kicks ने दर्शविलेली क्रिया करणार्याकडून किंवा कर्ता (subject) boy कडून एखाधा कर्म (object) football कडे स्थित्यंतरित झाली आहे. म्हणून kicks ह्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद (Transitive verb) असे म्हणतात.
- (Transitivie – म्हणजे एकाकडून दुसर्याकडे झालेले स्थित्यंतर Passing-over)
- दुसर्या वाक्यामध्ये, laughs या क्रियापदाने (verb) laughs दर्शविलेली क्रिया, ही क्रिया करणारा कर्ता (subject) boy पर्यंतच मर्यादित असते आणि कर्माकडे स्थित्यंतरित होत नाही. म्हणून laughs या क्रियापदाला अकर्मक क्रियापद (Intransitive) असे म्हणतात.
- (Intransitivie – म्हणजे एकाकडून दुसर्याकडे स्थित्यंतर न होणे.)
- व्याख्या – एखाधा क्रियापदाने दर्शविलेले क्रिया जर कर्त्याकडून कर्माकडे स्थित्यंतरित होत असेल तर त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात.
- व्याख्या – एखाधा क्रियापदाने दर्शविलेली क्रिया जर कर्त्याकडून कर्माकडे स्थित्यंतरित होत नसेल किंवा ते क्रियापद स्थिती किंवा अस्तित्व (state or being) व्यक्त करत असेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात.
- He ran a long distance. (Action) = (कार्य)
- The baby sleeps.(State) = (स्थिति)
- There is a flaw in this diamond. (Being) = (अस्तित्व)
- टीप – अकर्मक क्रियापद जर अस्तित्व (being) व्यक्त करत असेल तर क्रियापदाआधी व नंतर समान विभक्ती प्रकारांचा (case) उपयोग होतो.
- बहुतांशी सकर्मक क्रियापदानंतर एकच कर्म असते. परंतु give, ask, offer, promise, tel, etc. सारख्या सकर्मक क्रियापदानंतर दोन कर्मे येतात.
1. अप्रत्यक्ष कर्म (Indirect Object) अशी व्यक्ती जिला काही दिले आहे किंवा जिच्यासाठी काही केले आहे, आणि
2. प्रत्यक्ष कर्म (Direct Object) हे बहुतांशी एखाधा वस्तूचे नाव असते.
उदा.
- His father gave him (Indirect) a watch (Direct).
- He told me (Indirect) a secret (Direct).
Used Transitively Used Intransitively
1. The ants fought the wasps. 1. Some ants fight very fiercely.
2. The shot sank the ship. 2. The ship sank rapidly.
3. Ring the bell, Rama. 3. The bell rang loudly.
4. The driver stopped the train. 4. The train stopped suddenly.
5. HE sopke the truth. 5. He spoke haughtily.
6. The horse kicked the man. 6. This horse never kicks.
7. I feel a severe pain in my head. 7. How do you feel?
- टीप – काही क्रियापदे
- उदा. come, go, fall, die, sleep, lie इ. अशी क्रिया दर्शवितात जी कोणत्याही गोष्टीवर घडू शकत नाही. त्यामुळे अशी क्रियापदे सकर्मक म्हणून कधीच वापरता येत नाहीत.
- ‘The man killed himself’ या सारख्या वाक्यांमध्ये कर्ता आणि कर्म समान व्यक्तीचा संदर्भ देतात. त्यामुळेच असे क्रियापद परावर्तक (reflexively) म्हणून वापरले आहे असे म्हणतात.
- कधीकधी जरी क्रियापद परावर्तक म्हणून वापरले असले तरी कर्माचा स्पष्टोल्लेख नसतो.
- खालील उदाहरणात अध्याहत परावर्तक सर्वनाम कंसात दिलेले आहे.
- The bubble burst [itself].
- The guests made [themselves] merry.
- Please keep [yourselves] quiet.
- With these words he turned [himself] to the door.
- The Japanese feed [themselves] chiefly on rice.
- परंतु ही क्रियापदे कोणत्याही प्रकारचा परावर्तक भाव नसलेली अकर्मक क्रियापदे आहेत असेदेखील मानता येते.
- काही क्रियापदे परावर्तक म्हणून आणि सर्वसाधारण सकर्मक क्रियापदे म्हणूनही वापरता येतात.
उदा.
- Do not forget his name.
- I forget his his name.
- Acquit yourself as man.
- The magistrate acquitted him of the charge against him.
- I enjoy mysarlf sitting alone.
- He interested himself in his friend’s welfare.
- His talk does not interest me.
अकर्मक क्रियापदाचे सकर्मक क्रियापदांच्या रूपात बदल (Intransitive Verbs used as Transitives) :
- जेव्हा अकर्मक क्रियेचा वापर प्रेरणार्थक भाव (Causative sense) व्यक्त करण्याकरिता केला जातो तेव्हा ते सकर्मक बनते.
Intransitive (अकर्मक) Transitive (सकर्मक)
1. The horse walks. 1. He walks the horse.
2. The girl ran down the street. 2. The girl ran a needle into her finger (ran a needle=caused a needle to run)
3. Birds fly. 3. The boys fly their kites (i.e., cause their kites to fly).
- काही प्रचलित क्रियापदे त्यांच्या spelling अनुसार सकर्मक (transitive) किंवा अकर्मक (Intransitive) अशी वेगळी करता येतात. सकर्मक ही संबंधित अकर्मक क्रियापदांची प्रयोजक रुपे (causative forms) असतात.
Intransitive (अकर्मक) Transitive (सकर्मक)
1. Many trees fall in the monsoon. 1. Woodmen fell trees. (Fell=cause to fall)
2. Lie still. 2. Lay the basket there. (Lay=cause to lie)
3. Rise early with the lark. 3. Raise your hands. (Raise=cause to rise)
4. Sit there. 4. Set the lamp on the table. (Set=cause to sit)
- काही अकर्मक क्रियापदांना शब्दयोगी अव्यय (प्रेपोसीटीओण) जोडून सकर्मक करता येते.
उदा.
- All his friends laughed at (=derided) him.
- He will soon run through (=consume) his forture.
- Please look into (=investigate) the matter carefully.
- We talked about (=discussed) the affair several times.
- I wish for (=desire) nothing more.
- The Police Inspector b (=demanded) his name.
- कधीकधी शब्दयोगी अव्यय (Preposition) क्रियापदाच्या आधी जोडतात.
उदा.
- Shivaji overcmae the enemy.
- He brevely withstood the attack.
- The river overflows its banks.
- अकर्मक क्रियापदानंतर कधीकधी क्रियापदाच्याच अर्थाचे किंवा समधर्मी कर्म येते. अशा कर्माला सजातीय कर्म किंवा सजातीय व्दितीया (Cognate object किंवा Cognate Accusative) असे म्हणतात. लॅटीनमध्ये (Cognate म्हणजे समधर्मी) (akin-समान)
- I have fought a good fight.
- He laughed a hearty laugh.
- I dreamt a strange dream.
- He sleeps the sleep of the just.
- Let me die the death of the righteous.
- She sighed a deep sigh.
- She sang a sweet song.He run a race.
- Aurangzeb lived the life of an ascetic.
- सजातीय कर्म म्हणून वापरलेले नाम व्दितीया विभक्तीत असते.
- अंशत: सजातीय कर्माची (partially cognate objects)
- उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
- He ran a great risk(=he ran a course of great risk).
- The children shouted applause(=the children shouted a shout of applause).
- स्थळ (place), काळ (time), अंतर (distance), वजन (weight), मूल्य (value) इ. दर्शविणारे क्रियाविशेषण अथवा एखादे क्रियापद (verb) किंवा विशेषण (adjective) यांचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी (Modify) क्रियाविशेषणाप्रमाणे वापरण्यात येणार्या नामाला क्रियाविशेषण कर्म (Adverbial) किंवा क्रियाविशेषण व्दितीया असे म्हणतात आणि हे क्रियाविशेषण म्हणून व्दितीया विभक्तीत आहे असे म्हणतात.
उदा.
- He held the post ten years.
- I can’t wait a moment longer.
- He went home.
- He swam a mile.
- He weighs seven stone.
- The watch cost fifty rupees.
- काही सकर्मक क्रियापदे कधी-कधी अकर्मक क्रियापदे म्हणून वापरली जातात.
Transitive (सकर्मक) Intransitive (अकर्मक)
1. He broke the glass. 1. The glass broke.
2. He burnt his fingers. 2. He burnt with shame.
3. Stop him from going. 3. We shall stop here a few days.
4. Open all the windows. 4. The show opens at six o’clock
Why you have given examples in English language and not of Marathi language?