टिळक युगातील महत्वाच्या घटना
टिळक युगातील महत्वाच्या घटना
Must Read (नक्की वाचा):
1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :
- सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.
- शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्याची नियुक्ती केली.
- रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.
- ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.
- न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.
- भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.
2. बंगालची फाळणी (1905) :
- लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.
- बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.
- बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.
- आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.
- टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.
- सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.
3. टिळकांना शिक्षा :
- ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.
4. होमरूल लीग चळवळ :
- डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.
- थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.
- सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.
- लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.
- बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.
5. टिळकांचे निधन :
- लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰
- या कायद्यानुसार घेण्यात येणार्या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.
- एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.
- भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.
Nice mpsc world