ट्रेन व स्टेशनचे प्रकार

 

ट्रेन व स्टेशनचे प्रकार

  • ट्रेन चे प्रकार :
  • पॅसेंजर ट्रेन – जी ट्रेन स्टेशनवर थांबते तिला पॅसेंजर ट्रेन म्हणतात.
  • एक्सप्रेस ट्रेन – जी ट्रेन प्रमुख स्टेशनवर थांबते आणि तिचा वेग जास्त असतो तिला एक्सप्रेस ट्रेन म्हणतात.
  • मेल ट्रेन – जी ट्रेन विशेष करून डाक सामुग्री घेवून जाते तिला मेल ट्रेन म्हणतात. ही ट्रेन एक्सप्रेस सारखीच असते.
  • सुपरफास्ट ट्रेन – ज्या गाडीची गती तासी 100 कि.मी. पेक्षा जास्त असते तिला सुपर फास्ट ट्रेन म्हणतात.
  • गुडस ट्रेन – ही ट्रेन सामान किंवा वस्तु वाहून नेते. मालगाडीला डब्याला वॅगन आणि प्रवासी डब्याला कोच म्हणतात.
  • बुलेट ट्रेन – या ट्रेनची गती सर्वात जास्त असते. ही ट्रेन विद्युत चुंबकीय बलच्या आधारे चालते.
  • मोनो ट्रेन – ही ट्रेन पृथ्वीच्यावर अर्थात आकाशात रोप-वे सारखी चालते.
  • जनता एक्सप्रेस – या ट्रेनमध्ये फक्त व्दितीय श्रेणीचे डब्बे असते.
  • अप ट्रेन – जी ट्रेन मुख्यालयापसून निर्धारित स्टेशनपर्यंत जाते या प्रकाराला अप ट्रेन म्हणतात.
  • डाउन ट्रेन – जी ट्रेन मुख्यालयाकडे निर्धारित स्टेशनपासून परत येते या गाडीला डाउन ट्रेन म्हणतात.

रेल्वे स्टेशनचे प्रकार :

  • वे साईड स्टेशन – या स्टेशन वरुन एकाच दिशेने गाड्या जाणे-येणे करतात.
  • जंक्शन स्टेशन – या स्टेशन वरुन वेगवेगळ्या दिशेने गाड्या (मार्ग) जातात.
  • टर्मिनल स्टेशन – हे स्टेशन शेवटचे असते.
  • भूमिगत स्टेशन – हे स्टेशन जमिनीच्या खाली असते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.