द्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती
द्रव्याचे प्रकार :
1. द्रव्य :
द्रव्य तीन रूपात असतात.
1. स्थायू
2. द्रव
3. वायु
Must Read (नक्की वाचा):
2. मूलद्रव्य :
- मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेले असतात.
- त्याचा प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच असतात.
- कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही.
- सज्ञेचा वापर करून मूलद्रव्य दर्शविता येतात.
- एकूण 119 मूलद्रव्य ज्ञात आहेत,त्यापैकी 92 निसर्गात आढळतात.
मूलद्रव्याचे वर्गीकरण –
1. धातू
2. अधातू
3. धातुसदृश
1.धातू – धातू हे काठीण्य, वर्धंनियता, तन्यता, चकाकी आणि उष्णता व वीज सुवाहकता ही धातूची वैशिष्ट आहेत. सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात.
2. अधातू – अधातू हे न चकाकणारे, ठिसुल, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात.
3. धातुसदृश – काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात.अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत,
3. संयुगे :
- दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय.
- व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणार्या घटकांत विभाजन करता येते.
- रेणूसूत्राच्या सहाय्याने संयुगे दर्शविता येतात.
- पाणी हे संयुग आहे.
4. मिश्रणे :
- दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात.
- मिश्रणात मूल घटकांचे गुणधर्म कायम राहतात.
- मिश्रणातील मूळ घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येतात.
- मिश्रणातील घटक ठराविक प्रमाणात नसतात.
- उदा. हाताने उचलणे, लोहचुंबक फिरवणे इ.
- दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात.
- हवा हे एक मिश्रण आहे.
मिश्रणाचे प्रकार –
1.समांगी मिश्रण
2. विषमांगी मिश्रण
- समांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात.
- समांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात समान असतात.
- पोटॅशिअम परमॅँगनेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे.
- द्रावण – दोन किंवा अधिक पदार्थाच्या मिश्रणास द्रावण म्हणतात.
- उदा. सोडा वॉटर.
- स्थायूची द्रावणे (संमिश्रे) व वायूंची द्रावणे (हवा)
- द्रावनातील कण अतिशय लहान असतात. ते त्यातून जाणार्या प्रकाश शलाकेला विखातू देत नाही.
- द्रव्य विरघळतो त्यास द्रावण म्हणतात.
- विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात.
- विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसतात.
- पाणी आणि तेलाचे मिश्रण विषमांगी आहे.
- निलंबन – हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात हे कण आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो.
- कलिल – कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलिल कण हे निलंबन कणांपेक्षाही आकाराने लहान असतात.
- हे समांगी द्रवनाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी द्रावण आहे.
- कलिल घटक अपस्करीत प्रावस्था व अपस्कारीत माध्यमात असतात.