उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 8
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 8
- चक्र – गाडीचे चाक, रथ
- चक्रम – विक्षिप्त
- चिता – सरण
- चिंता – काळजी
- चिज – वस्तू
- चीज – संगीतातील काव्य
- छकड – तोटा, नुकसान, कपट
- छकडा – तटया घातलेली लहान बैलगाडी
- छकडी – सहाचे माप
- छकडे – लहान लाडके मूल
- छटा – प्रतिबिंब, छाया
- छट्टा – टप्पा, अंतर
- छत – नकार वा तिरस्कार दर्शक उद्गार
- छत – आच्छादन, चांदवा
- छाता – छत्री
- छाती – वक्ष:स्थळ
- जग – सृष्टी, दुनिया
- जंग – युद्ध, मळ, दोष
- जंगणे – कीट किंवा मळ चढणे
- जगणे – वाचणे, जीवंत राहणे
- जट – गुंतलेले केस, जटा
- जड – वजनदार, अचेतन, धन
- जनन – जन्म
- जतन – संगोपन
- जबरा – जबर मोण