उपस्थिती भत्ता योजनेबद्दल माहिती
उपस्थिती भत्ता योजनेबद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
- प्राथमिक शाळेतील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्य शासन मुलींना ‘उपस्थित भत्ता योजना’ राबवित आहे.
- या योजने अंतर्गत शालेय कामकाजाचे दिवसांपैकी 75 टक्क्यांपेक्षा जास्त दिवस शाळेत उपस्थिती असणार्या 1 ली ते 4 थी पर्यंतच्या मुलीच्या पालकांना एक रुपया प्रतिदिवस आणि एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त रु 220
- इतका उपस्थिती भत्ता दिला जातो.
- या योजनेमध्ये आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सर्व मुली व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील अ.जा, अ.ज आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींचा समावेश असतो.
- सन 2013-14 मध्ये रु 10.81 कोटी खर्च झाला व लाभार्थी मुलींची संख्या सुमारे 4.91 लाख होती.
- सन 2013-14 मध्ये अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या 4.70 लाख आहे.