वय (वयवारी)

Vay (Vayvari)

वय (वयवारी)

Must Read (नक्की वाचा):

प्रमाण भागीदारी


प्रकार पहिला :-

नमूना पहिला –

उदा. अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?

  • 15 वर्षे
  • 10 वर्षे
  • 5 वर्षे
  • 20 वर्षे

उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :-
वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.
अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

नमूना दूसरा –

उदा. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?

  • 11 वर्षे
  • 36 वर्षे
  • 34 वर्षे
  • 38 वर्षे

उत्तर : 38 वर्षे

क्लृप्ती :-
दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2

(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

नमूना तिसरा –

उदा. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

  • 24 वर्षे
  • 32 वर्षे
  • 40 वर्षे
  • 48 वर्षे

उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-
राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x

दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x =16,
x=8
4x = 4×8 = 32

नमूना चौथा –

उदा. अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

  • 21 वर्षे
  • 23 वर्षे
  • 15 वर्षे
  • 28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :-
सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20-5 = 15 वर्षे,

अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास
x/3+8=15 म्हणून x/3=7
 x=21

 प्रकार दूसरा :-

नमूना पहिला –

उदा. सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

  • 10 वर्षे
  • 12 वर्षे
  • 15 वर्षे
  • 18 वर्षे

उत्तर : 12 वर्षे

स्पष्टीकरण :-
सीता : गीता
आजचे वय   6x  :  5x
दोन वर्षापूर्वीचे (6x-2)2 :  (5x-2)
6x-2/5x-2 = 5/4
4(6x-2) = 5(5x-2)   
24x-8=25x-10   
x=2
सीताचे आजचे वय = 6x = 6×2=12 वर्षे

नमूना दूसरा –

उदा. मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती?

  • 6 वर्षे
  • 10 वर्षे
  • 35 वर्षे
  • 11 वर्षे

उत्तर : 11 वर्षे

स्पष्टीकरण :-
मुलगी : आई

5 वर्षांपूर्वी 1 : 5
आजचे वयांचे
गुणोत्तर  (x+5) : (5x+5)
5 वर्षांनंतर
वयांचे गुणोत्तर (x+10) : (5x+10)
x+10/5x+10 = 2/5
5(x+10) = 2(5x+10)
5x=50=10x+20
5x=30
x=6
मुलीचे आजचे वय = x+5
6+5 = 11 वर्षे

नमूना तिसरा –

उदा. मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये 3:7:9 या प्रमाणात होतील ?

  • 10
  • 6
  • 3
  • 5

उत्तर : 5

स्पष्टीकरण:
3+7+9=19 भाग,  उदाहरणाप्रमाणे (10+30+49) = 80

80+3x/19 =19×5 = 95
85 – 80 = 15,
3x=15
x=5
You might also like
3 Comments
  1. Mahesh says

    Dear Sir,
    I am very much thank s to you sir, I use many times your website, I got so much knowledge. But one suggestion.
    I solve problems of maths, found some mistakes, please correct it ,I think it was typing mistake s
    Thank you Sir ji

    1. Sandip Rajput says

      Thank you so much for your kind reply… Yes.. Having some mistakes and we will try to find and correct them.
      Keep supporting us like this, as it increases our passion towards this great cause..

      Thanks again..

  2. Chetan jayawant gawade says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.