वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती
वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती
Must Read (नक्की वाचा):
नमूना पहिला –
उदा. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
- 45 से.
- 15 से.
- 25 से.
- 35 से.
उत्तर : 15 से.
एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶: 300/72×18/5=15 सेकंद
नमूना दूसरा –
उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
- 1मि. 12से.
- 1मि. 25से.
- 36से.
- 1मि. 10से.
उत्तर : 1मि. 12से.
एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5
नमूना तिसरा –
उदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
- 540मी.
- 162मी.
- 270मी.
- 280मी.
उत्तर : 270 मी.
नमूना चौथा –
उदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
- 54 कि.मी.
- 40 कि.मी.
- 50 कि.मी.
- 60 कि.मी.
उत्तर : 40 कि.मी.
वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)
नमूना पाचवा –
उदा. मुंबईला नागपूरला जाणार्या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
- दु.12 वा.
- 12.30 वा.
- 1.30 वा.
- 11.30 वा.
उत्तर : 12.30 वा.
भेटण्यास दुसर्या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास
नमूना सहावा –
उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
- दु.12.30 वा.
- दु.12वा.
- दु.1.30 वा.
- दु.1वा.
उत्तर : दु.12.30वा.
नमूना सातवा –
उदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
- 300 कि.मी.
- 240 कि.मी.
- 210 कि.मी.
- 270 कि.मी.
उत्तर : 240 कि.मी.
60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.
Dir sar my name mayur please join this group
Nice
Join group please name,
nagesh naiknavare
Nice sir
Nice sir
Nice Sir
Join group please name,
nagesh naiknavare
please Join this group..
Join group please name,
pawar satish
खुप छान आयुष्यात नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या ते पण एकाच ठिकाणी