Current Affairs (चालू घडामोडी)

1 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

1 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 एप्रिल 2019)

‘इस्त्रो’व्दारे एमीसॅटसह 28 नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण:

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे 28 नॅनो उपग्रहांचे आज (1 एप्रिल) श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी इस्रोने केली. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी पीएसएलव्ही सी 45 प्रक्षेपक एमीसॅट व 28 नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले.
  • पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान 2008 व मंगळ ऑर्बिटर 2013 या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका पार पाडली होती. यात अमेरिकेतील 24, लिथुआनियातील 11, स्पेनमधील 1 तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.
  • ‘इस्रो’चा हा 47वा पीएसएलव्ही मोहीम असून ही मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात 749 किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि 504 किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करेल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (30 मार्च 2019)

भारतीय नेमबाजांकडून सुवर्णपदकांची लयलूट:

  • भारतीय नेमबाजांनी 10 मीटर एअर रायफल गटातील चारही सुवर्णपदकांना गवसणी घालत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येला 12 पर्यंत पोहोचवले आहे. तैपेईच्या तायुअन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत भारताने आतापर्यंत झालेल्या स्पर्धेतील 14 पैकी 12 प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
  • स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताच्या दिव्यांशू सिंह पनवार आणि एलव्हेनिल व्हॅलारिवान यांनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात सुवर्णपदकांची कमाई केली. दिव्यांशूने 249.7 गुणांसह सुवर्ण तर किमने 247.4 गुणांसह रौप्य आणि शिनने 225.5 गुणांसह कांस्यपदकांची कमाई केली.
  • महिलांच्या गटात एलाव्हेनिलने 250.5 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर तैपेई लिन यिंग शिनने 250.2 गुणांसह रौप्य आणि कोरियाच्या पार्क सनमिनने 229.1 गुणांसह कांस्यपदक मिळवले.
  • पुरुषांच्या सांघिक प्रकारात दिव्यांशू, रवी कुमार आणि दीपक कुमार यांनी 1880.7 गुणांसह सुवर्णपदक मिळवले. कोरियाच्या संघाने 1862.3 गुणांसह रौप्यपदक पटकावले.
  • महिलांच्या सांघिक प्रकारात एलाव्हेनिल, अपूर्वी चंडेला आणि मेघना सज्जानारने 1878.6 गुणांसह सुवर्ण तर तैपेईच्या संघाने 1872.5 गुणांसह रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेची 1 एप्रिल रोजी सांगता होणार असून अखेरच्या दिवशी कनिष्ठ गटात 10 मीटर एअर रायफल प्रकाराचे सामने होणार असून त्यातदेखील भारताला पदकांची अपेक्षा आहे.

अपूर्वा ठाकूर जागतिक सौंदर्य स्पर्धेत तिसर्‍या स्थानी:

  • मिस टीन युनिव्हर्स 2019 या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अलिबागच्या अपूर्वा ठाकूरने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करताना तिने या जागतिक स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
  • अमेरिका-पनामा येथे नुकतीच जागतिक सौंदर्य स्पर्धा पार पडली. प्रथम क्रमांकावर ब्राझील आणि द्वितीय क्रमांक मेक्सिकोचे स्पर्धक राहिले. भारताचे नाव प्रथम तीन क्रमांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वा ठाकूरवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • अमेरिकेमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये विविध 28 देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अर्जेंटिना, अमेरिका, मेक्सिको आणि कोलंबिया सारख्या देशांचा समावेश होता. या 28 मधील 16 स्पर्धकांची निवड अंतिम पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यानंतर सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली.
  • अपूर्वा ठाकूर या दोन्ही विभागामधून अंतिम सहा स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. सहा स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या फेऱ्यांमध्ये ब्राझीलच्या सौंदर्यवतीने मिस टीन युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा 2019चा मुकूट पटकावला.
  • दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोच्या सौंदर्यवतीची निवड झाली तर तिसर्‍या क्रमांकावर भारताच्या अपूर्वा प्रवीण ठाकूर हिची निवड करण्यात आली.

पॅन कार्डला आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ:

  • पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) आणि आधारकार्डची जोडणी करणे बंधनकरक असल्याने त्यासाठीची मुदत वाढविण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदत 31 रोजी संपणार होती. मात्र आता ही तारिख पुढे ढकलण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पॅन आणि आधार जोडणी करता येणार आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतलेल्या निर्णयानुसार ही मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली.
  • पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 30 जून 2018 रोजी ही मुदत संपली होती. मात्र त्यानंतर ही मुदत 31 मार्च 2019 करण्यात आली होती.
  • दरम्यान, आधार क्रमांकाशी जोडणी न केलेले पॅन अवैध ठरू शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटीने सांगितले. ही मुदत वाढवली असली तरी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे एक एप्रिलपासून अनिवार्यच असेल, असेही सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

विजया आणि देना बॅंकेची बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण:

  • विजया आणि देना बॅंकेची बॅंक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, आजपासून (1 एप्रिल) बॅंक ऑफ बडोदा ही देशातील दुसरी मोठी बॅंक म्हणून अस्तित्वात येणार आहे.
  • आठ दशके बॅंकिंग सेवेत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या विजया आणि देना या दोन बॅंकांची ओळख काळाच्या पडद्याआड जाणार आहे; मात्र ग्राहकांमध्ये संभ्रम होऊ नये, यासाठी विजया आणि देना बॅंकेची नाममुद्रा आणखी काही काळ कायम राहणार असून, त्यावर बॅंक ऑफ बडोदाचा उल्लेख होईल.
  • केंद्र सरकारने सप्टेंबर 2018 मध्ये तीन बॅंकांचे एकत्रीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणामुळे बॅंक ऑफ बडोदा ही एसबीआयनंतरची सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बॅंक बनली आहे.
  • रिझर्व्ह बॅंकेच्या माहितीनुसार, विजया आणि देना बॅंकेचे ग्राहक आणि ठेवीदार यापुढे बॅंक ऑफ बडोदाचे ग्राहक होतील. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने बॅंक ऑफ बडोदाला 5 हजार 42 कोटींची भांडवली मदत जाहीर केली होती.

दिनविशेष:

  • 1 एप्रिल हा दिवसएप्रिल फूल दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
  • मुंबई अग्निशमन दलाची स्थापना 1887 मध्ये झाली.
  • सन 1895 मध्ये भारतीय लष्कर स्थापन झाले.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापककेशव बळीराम हेडगेवार‘ यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये झाला.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना सन 1935 मध्ये झाली
  • सन 1957 मध्ये भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 यावर्षी (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • सन 2004 मध्ये गूगलने जीमेल (Gmail) ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago