1 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 जानेवारी 2022)
पंतप्रधान मोदींची घोषणा देशाच्या अन्नदात्यांना मिळणार 20 हजार कोटी रुपये :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचं सांगितलं.
यानुसार 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
तर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच या अंतर्गत 20 हजार कोटी रुपयांचा 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होईल.
तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलाय आणि तरीही तुम्हाला त्या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट दोन्हींच्या माध्यमातून मदत घेऊ शकता.
वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच स्टेटस जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in ला भेट द्या.
भारताची एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश.
स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे.
मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत.
तर आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.
यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ध्वनीच्या तीनपट वेगाने हे प्रवास करु शकते, तर 290 किलोमीटरपर्यंत अचुक मारा करु शकते.
यामुळे हे क्षेपणास्त्र रडारवर शोधणे आणि त्याला भेदणे हे अत्यंत अवघड आहे.
स्मृतीला सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन :
भारताची आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाला 2021मधील तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील दिमाखदार कामगिरीसाठी ‘आयसीसी’च्या वर्षांतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठीही नामांकन लाभले आहे.
तर इंग्लंडची टॅमी ब्यूमाँट, दक्षिण आफ्रिकेची लिझेले ली आणि आर्यलडची गॅबी लेविस या तीन क्रिकेटपटू स्पर्धेत आहेत.
तसेच स्मृतीला वर्षांतील सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूचे नामांकन देण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) 2021 या वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार 23 जानेवारीला घोषित करण्यात येणार आहेत.
25 वर्षीय सलामीवीर स्मृतीने वर्षांतील 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 38.86च्या सरासरीने एकूण 855 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
भारत ठरला पहिला आशियाई देश :
सेंच्युरियन हे दक्षिण आफ्रिकेमधील सर्वात आव्हानात्मक मैदान मानले जाते.
तर या मैदानावर आफ्रिकेवर पहिल्या कसोटी सामन्यात मिळवलेला विजय हा भारताच्या अष्टपैलू पराक्रमाची साक्ष देतो, अशा शब्दांत कर्णधार विराट कोहलीने संघसहकाऱ्यांची प्रशंसा केली आहे.
आफ्रिकेत सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट स्टेडियमवर कसोटी विजय मिळवणारा भारत हा गुरुवारी पहिला आशियाई देश ठरला.
भारताने 2021 या वर्षांची सुरुवात ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात हरवून केली होती, तर वर्षांचा समारोप आफ्रिकेवर विजयानिशी केली.
क्विंटन डी कॉकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती :
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पराभव झाल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याची घोषणा केली आहे.
भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतही तो फार काही चांगला खेळ करु शकला नाही. दोन्ही डावात तो अपयशी ठरला.
सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला.
भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नाही.
भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता :
भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे.
दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने DLS पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला.
यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कपवर जिंकला आहे.
पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला.
दिनविशेष:
सन 1911 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात 31 जानेवारी 1920 रोजी झाली.
सोविएत रशियाने सन 1929 मध्ये लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले होते.
सन 1949 यावर्षी बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 31 जानेवारी सन 1950 रोजी संसदेपुढे पहिले भाषण केले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.