1 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 मे 2020)
भारताची ग्लेनमार्क कंपनी सुरु करणार करोना व्हायरसवरील औषधाच्या चाचण्या :
- ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेड या भारतीय औषध कंपनीला फॅव्हीपीरावीर या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे.
- तर या मान्यतेमुळे ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली. फॅव्हीपीरावीर हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे.
- तसेच जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर करण्याची 2014 मध्ये परवानगी देण्यात आली.
- फॅव्हीपीरावीर हे औषध करोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. या औषधाचे साईड इफेक्टही होत नाहीत. मागच्या महिन्यात चिनी अधिकाऱ्यांनी सुद्धा फॅव्हीपीरावीर प्रभावी ठरत असल्याचे म्हटले होते.
Must Read (नक्की वाचा):
भारताचे माजी फुटबॉल कर्णधार चुनी गोस्वामी यांचं निधन :
- भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांचं गुरुवारी कोलकात्यात निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.
- 1962 साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना चुनी गोस्वामी यांनी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.
- फुटबॉल व्यतिरीक्त गोस्वामी बंगालकडून स्थानिक क्रिकेटही खेळले आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख होती.
- 1962 च्या यशानंतर 1964 सालीही गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रौप्यपदक मिळालं होतं.
ज्येष्ठांची पेन्शन वाढणार :
- कोरोनाच्या संकटामुळे बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजाचे दर झपाट्याने कमी होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या या निर्णयामुळे काही पेन्शनर्सना थोडा दिलासा मिळेल.
- तर नव्या योजनेमुळे सुमारे सात लाख पेन्शनर्सना आर्थिक फायदा होणार असून सरकारच्या तिजोरीवर मासिक 1400 ते 1600 कोटींचा भार पडेल, असा अंदाज आहे.
- तसेच 2008 सालापर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकूण पेन्शनच्या रकमेपैकी एकतृतीयांश निधी एकरकमी घेण्याची मुभा होती. त्यानंतर उर्वरित रकमेच्या आधारावर त्यांना मासिक पेन्शन अदा केली जात होती.
- ज्या कर्मचार्यांनी या पद्धतीचा अवलंब केला होता त्यांना गेली 15 वर्षे दोनतृतीयांश रकमेवर पेन्शन अदा केली जात होती. ती आता 100 टक्के रकमेवर मिळेल. मे महिन्यापासून ही पेन्शन द्या, असे आदेश असले तरी पीएफ कार्यालयांमधील यंत्रणांमध्ये त्याच्या नोंदी पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता पीएफ अधिकायांनी व्यक्त केली आहे.
- 15 वर्षे पेन्शनच्या कालावधीची अट असल्याने 1 एप्रिल, 2005 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचायांना त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच, निवृत्तीनंतर 100 टक्के निधीवर 15 वर्षे पेन्शन घेणाºयांचा या योजनेत समावेश होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात :
- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकन सरकारने यूएसएआयडीच्या माध्यमातून कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला अतिरिक्त 30 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे.
- यापूर्वी 6 एप्रिलला यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी 29 लाख अमेरिकन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती.
- आधीच आपल्या देशासाठी भल्या मोठ्या पॅकेजची घोषणा केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगातील इतर देशांसाठीही मदतीचा हात देत आहेत.
भारताच्या अवकाश मोहिमेला फटका, थांबलं चार पायलट्सचं प्रशिक्षण :
- करोना व्हायरसचा भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेला फटका बसला आहे. रशियामध्ये इंडियन एअर फोर्सच्या चार फायटर पायलट्सचे प्रशिक्षण थांबले आहे.
- तर या पायलट्सची भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झाली आहे. रशियामध्ये त्यांचे अंतराळवीर बनण्याचे प्रशिक्षण सुरु होते. पण सध्या लॉकडाउनमुळे हे पायलट्स घरामध्ये बंदिस्त आहेत.
- मानवी अवकाश मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर करोना व्हायरसमुळे अशी परिस्थिती उदभवेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. मॉस्को जवळच्या स्टार सिटीमधील गागारीन कॉसमोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरु होते. पण सध्या करोना व्हायरसमुळे त्यांचे प्रशिक्षण पूर्णपणे बंद आहे. हे पायलटस घरामध्ये बंदिस्त आहेत.
- भारतीय अवकाशवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी जून 2019 मध्ये ग्लाव्हकॉसमॉस आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्यामध्ये करार झाला आहे.
दिनविशेष :
- 1 मे : जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन
- 1 मे 1760 मध्ये किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
- द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये 1 मे 1840 मध्ये जारी केले गेले.
- हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल 1 मे 1844 मध्ये स्थापन झाले.
- 1 मे 1882 मध्ये आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
- आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत 1 मे 1886 मध्ये पहिल्यांदा साजरा केला.
- 1 मे 1890 मध्ये जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
- रामकृष्ण मिशन ची सुरूवात 1 मे 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली.
- 1 मे 1927 मध्ये जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण 1 मे 1930 मध्ये करण्यात आले.
- गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली.
- 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.