2 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 मे 2020)
देशभरातील व्यापाऱ्यांसाठी ई-कॉमर्स पोर्टल उपलब्ध :
- कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय संस्थेने भारतातील व्यापाऱ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित www.bharatemarket.in हे ई-कॉमर्स पोर्टल उपलब्ध करून दिल्याची माहिती ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी येथे दिली.
- तर जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला.
- ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्यांनी गेल्या काही वर्षात भारतीय व्यापार क्षेत्राला मोठे आव्हान निर्माण केले होते व त्याचा फार मोठा फटका भारतीय व्यापार क्षेत्राला बसला आहे.
- तसेच या आव्हानाला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारेच भारतातील व्यापारी, उत्पादक यांना आधुनिक चेहरा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘कॉन्फेडरेशन’ चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी याची अधिकृतपणे घोषणा केली.
- भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत कार्यरत व्यापार विकास विभागाचा हे प्लॅटफॉर्म बनवण्यामध्ये सक्रिय सहभाग असून, भारतीय व्यापाऱ्यांना बळ देण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान व्यापाऱ्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- तर या तंत्रज्ञानामध्ये भारतातील वेगवेगळ्या भागात व्यापार उद्योग करणारे व्यापारी,उद्योजक यांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले असून, याला तंत्रज्ञानाच्या परिभाषेत ‘फिजिटल’ असे नवीन नामकरण केले आहे.
- प्रत्यक्ष व्यापार करणारे व्यापारी, उद्योजक हेच या ई-प्लॅटफॉर्मवर सुद्धा सहभागी असणार आहेत. यामध्ये लहान-मोठे उत्पादक व सर्व प्रकारचे व्यापारी यांना सामावून घेतले जाणार असून, या तंत्रज्ञानाची मालकी सुद्धा ‘शेअर होल्डर’ पद्धतीने भारतीय व्यापारी, उद्योजकांची असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव :
- ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
- 13.5 किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची 20 लाख पौंड (18.96 कोटी रुपये) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.
- पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले.
- एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला असावा, असे मानले जाते.
- अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.
भारतीय संघाने गमावले कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी नवी क्रमवारी जाहीर केली आणि यानुसार भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले.
- नव्या क्रमवारीनुसार आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच न्यूझीलंड संघाने दुसरे स्थान मिळवले आहे.
- तर सुमारे चार वर्षांनंतर भारताने कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले.
- आयसीसी क्रमवारी नियमानुसार वार्षिक क्रमवारी जाहीर करताना यामध्ये 2016-17 सालच्या कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारताची तिसर्या स्थानी घसरण झाली असून, 2016 सालानंतर भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान गमवावे लागले.
- त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान मात्र भारताने अद्याप कायम राखले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा :
- विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि 21 मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
- महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.
- आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- विधान परिषदेच्या नऊ जागा 24 एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
शाळा, महाविद्यालयांसाठी एचआरडीची नियमावली :
- करोनाचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात 16 मार्चपासून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर 24 मार्च रोजी देशव्यापी टाळेबंदी घोषित करण्यात आली आणि त्याला 3 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
- शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर सामाजिक अंतराबाबतची नियमावली तयार केली जात आहे.
- मानव संसाधन विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळांसाठी तर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांसाठी मार्गदर्शत तत्त्वे तयार केली जात आहेत.
- विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची यापूर्वीच शिफारस केली आहे तर विविध माध्यमांच्या वतीने शाळांनीही शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे.
टेलरला तिसऱ्यांदा मिळविले ‘सर रिचर्ड हॅडली’ पदक :
- अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा यंदाच्या वर्षात केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला.
- तर त्याने यंदा तिन्ही प्रकारांत शानदार कामगिरी करताना तिसऱ्यांदा ‘सर रिचर्ड हेडली’ पदक पटकावले.
- तसेच यंदाच्याच सत्रात त्याने माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा बनवणा-या फलंदाजाचा मान मिळविला होता.
- क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा पराक्रमही त्याने केला; आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
‘फेड कप हार्ट’पुरस्कारासाठी सानिया मिर्झाला नामांकन :
- 2003 सालापासून भारतीय टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
- तर दखल घेण्याची बाब म्हणजे या पुरस्कारासाठी नामांकित झालेली सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
- तसेच या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आशिया-ओशियानिक विभागातून इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलिन नुग्रोहो हिच्यासह सानियाला नामांकन देण्यात आले आहे.
- सानियाने नुकतेच चार वर्षांनंतर फेड चषक स्पर्धेत पुनरागमन केले होते.
- तीन विभागांतून एकूण सहा खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. युरोप-आफ्रिका विभागातून अॅनेट्ट कोंटावेट (इस्टोनिया) आणि एलेओनोरा मोलिनारो (लक्सेमबर्ग); अमेरिकन विभागातून पॅराग्वेच्या व्हेरोनिका केपेडे रॉय आणि मेक्सिकोच्या फर्नांडा कोट्रेरास गोमेज यांनाही नामांकन मिळाले आहे.
- तर या पुरस्काराचा विजेता निवडण्यासाठी 1 ते 8 मे या कालावधीत मतदान होणार आहे.
दिनविशेष :
- मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी ‘भालजी पेंढारकर’ यांचा जन्म 2 मे 1899 मध्ये झाला.
- 2 मे 1964 रोजी बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.
- वेस्ट इंडीजचा प्रख्यात क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म 2 मे 1969 रोजी झाला.
- सन 1999 मध्ये 2 मे रोजी मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.
- एस.राजेन्द्रबाबू यांनी 2 मे 2004 रोजी भारताचे 34वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
Can you please drop app link