1 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
1 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 ऑक्टोबर 2020)
भारताच्या ‘फेलुदा’ कोविड चाचणीत नेदरलँडला स्वारस्य दाखवले:
भारताच्या ‘फेलुदा’ या सोप्या, विश्वासार्ह व किफायतशीर कोविड चाचणीत नेदरलँडने स्वारस्य दाखवले असल्याची माहिती वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी दिली.
नेदरलँडला त्यांची करोना चाचणी पातळी वाढवायची आहे. त्यामुळे त्यांनी ‘सीएसआयआर’ला पत्र पाठवून या चाचणी संचाबाबत चौकशी केली आहे.
फेलुदा चाचणीत त्यांना स्वारस्य आहे याचे कारण, ही अचूक व स्वस्त तसेच कमी वेळात होणारी चाचणी आहे. टाटा समूहाने त्यात व्यावसायिक भागीदारी केली आहे, असे मांडे यांनी सांगितले.
भारतीय औषध महानियंत्रकांनी या चाचणीला मंजुरी दिली असून त्यात जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कमी नमुन्यातही अचूक रोगनिदान होते.
सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
भारताने बुधवारी ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र 400 किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.
‘ब्रह्मोस’ हे भारताचे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. भारत आणि रशियाने मिळून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओच्या पीजे-10 प्रकल्पातंर्गत ही चाचणी करण्यात आली.
300 किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.
ठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे:
सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
करोना काळात 13 ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही पहिलीच बॅडमिंटन स्पर्धा आहे. सायना, श्रीकांतपुढे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे.
फ्रान्सच्या यॅले होयॉक्सविरुद्ध सायनाची लढत आहे.
टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरण्याकरता सायना, श्रीकांतला क्रमवारीतील गुणांमध्ये वाढ करावी लागणार आहे.
लिव्हरपूलचा सलग तिसरा विजय:
गतविजेत्या लिव्हरपूलने यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची धडाक्यात सुरुवात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
पिछाडीवर पडल्यानंतर लिव्हरपूलने पुनरागमन करत आर्सेनलचे आव्हान 3-1 असे मोडीत काढले.
अलेक्झांड्रे लाकाझेट्टे याने 25व्या मिनिटाला आर्सेनलचे खाते खोलल्यानंतर तीन मिनिटांनी सादियो माने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली.
34व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांड्र-आरनॉल्ड याच्याकडून मिळालेल्या क्रॉसवर अँड्रय़ू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1 असे आघाडीवर आणले.
सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना दिओगो जोटा याने तिसरा गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष:
1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कॉफी दिन तसेच आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन आहे.
सन 1837 मध्ये भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 मध्ये झाला.
गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि. माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झाला.
भारतात1958 या वर्षापासून दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी सन 1959 मध्ये भारताचे 6वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.