10 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 फेब्रुवारी 2022)
गौतम अदानी ठरले जागतील सर्वात वेगाने संपत्ती वाढणारे कोट्याधीश :
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
तर त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.
मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे.
तसेच बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटलंय.
तर याचवेळी अंबानींची एकून संपत्ती ही 87.9 बिलीयन डॉलर्स इतकी आहे.
अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलीयन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत.
भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘एफआयएच’प्रो लीग हॉकीमधील अप्रतिम कामगिरी सुरू ठेवताना बुधवारी दुसऱ्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारताने सलामीच्या लढतीत फ्रान्सवर 5-0 असा दिमाखदार विजय मिळवला होता.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही दर्जेदार खेळ करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला.
भारताकडून जुगराज सिंग, उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, अभिषेक, गुरसाहिबजीत सिंग, दिलप्रीत सिंग, मनदीप सिंग यांनी गोल झळकावले.
विराटने नवा विक्रम नोंदवला :
भारतीय क्रिकेट संघ आज बुधवारी वेस्ट इंडीजविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळत आहे.
तर या सामन्यासाठी मैदानात उतरताच माजी कर्णधार विराट कोहलीने नवा विक्रम रचला आहे.
विराटने खास शतक ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतीय भूमीवर 100 वनडे सामने खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
तर विराटने कारकिर्दीतील 259वा वनडे सामना खेळताना ही कामगिरी केली.
तसेच पहिल्या वनडेत 8 धावांची खेळी करत विराटने 5 हजार धावा पूर्ण केल्या.
दिनविशेष :
जे. आर. डी टाटा हे 1929 मध्ये पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले होते.
1931 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली होती.
पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली आहे.
गांधी-वध अभियोगातून 1949 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली होती.
3 years ago
Dhanshri Patil
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.